श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब हा प्रशिक्षित शेफ (आचारी) होता असे दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील साकेत न्यायालयात सांगितले आहे. मंगळवारी या हत्या प्रकरणाची सुनावणी साकेत न्यायालयात सुरू झाली. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, ताज हॉटेलमध्ये आफताबने शेफ म्हणून प्रशिक्षण घेतले होते आणि मांस कसे साठवावे याची त्याला पूर्ण माहिती होती. शिवाय श्रद्धाला मारल्यानंतर त्याने शुष्क बर्फ आणि अगरबत्ती मागवली होती. तसेच श्रद्धाची हत्या केल्यावर त्याने नव्या मुलीशी नाते तयार केले आणि तिच्याशी संपर्कही साधला.
दिल्ली पोलिसांनी घडलेला सगळा घटनाक्रम न्यायालयात सांगितला. दिल्ली पोलिसांतर्फे अमित प्रसाद हे बाजू मांडत आहेत तर आफताबने आपले वकील एम.एस. खान यांना बदलून नवे वकील नेमले आहेत. सगळी कागदपत्रे एलएसी या नव्या फर्मकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. त्यामुळे आता सुनावणीची नवी तारीख २० मार्च देण्यात आली आहे.
आफताब हा १२नोव्हेंबर २०२२ पासून कोठडीत आहे. श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
हे ही वाचा:
औरंग्या बुडाला पण पिलावळीचं काय?
आनंद द्विगुणित करणारा रंगांचा सण “होळी”
आरएसएसच्या पुढाकाराने गर्भात वाढणारे बाळ शिकणार ‘भारतीय संस्कृती’
इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर
दिल्ली पोलिसांनी २४ जानेवारीला यासंदर्भात ६ हजार पानी आरोपपत्र दाखल केले. आफताबवर ३०२ आणि २०१ ही कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आफताबची नार्को, पॉलिग्राफ चाचणी केली असून त्याची डीएनए चाचणीही करण्यात आली आहे. यासंदर्भात १५० साक्षीदारांच्या जबान्या घेण्यात आल्या असून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी आफताबच्या आवाजाचे नमुनेही गोळा केले आहेत.