राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

एटीएस करणार चौकशी

राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

यूपी एटीएसने अलिगढमधून आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या अलीगढ मॉड्यूलशी संबंधित एका दहशतवाद्याला अटक केली आहे. फैजान बख्तियार असे त्याचे नाव असून त्याच्यावर २५ हजार रुपयांचे बक्षीस आहे. आतापर्यंत या मॉड्यूलमधील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या फैजानने प्रयागराजच्या रिझवान अश्रफ यांच्यामार्फत इसिसची शपथ घेतली होती.

सूत्रांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या फैजानने त्याच्या काही साथीदारांसह अलीगढचे ISIS मॉड्यूल तयार केले होते. या सर्व आरोपींनी इसिसची शपथ घेतली आहे. मात्र, एटीएसने या सर्वांना अटक केली आहे. हे मॉड्युल मोठी दहशतवादी घटना घडवून आणण्यासाठी तयार होते.एटीएस लवकरच फैजानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणार आहे.

हे ही वाचा:

शेअर बाजाराच्या निर्देशांकात लक्षणीय घट

नरेंद्र मोदींच्या गावात सापडले २८०० वर्षे जुने मानवी वसाहतीचे अवशेष

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

पंतप्रधान मोदींनी शेअर केला लतादीदींचा शेवटचा श्लोक

दरम्यान, अलीगड मुस्लिम विद्यापीठातून पेट्रोकेमिकलमध्ये बीटेक केलेल्या अब्दुल्ला अर्सलानला यूपी एटीएसने नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. एटीएसचा दावा आहे की, अब्दुल्ला अर्सलान आयएसआयएस संघटनेशी संबंधित असून तो जिहादसाठी येथे लष्कर उभारत होता.अब्दुल्ला अर्सलानच्या खोलीतून असे अनेक वस्तू जप्त केल्या आहेत, ज्यावरून तो दहशतवादी असल्याचे स्पष्ट होते, असा यूपी एटीएसचा दावा आहे.यूपी एटीएसने अब्दुल्ला अर्सलानकडून पेन ड्राईव्ह, मोबाईल फोनसह अनेक संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत, जे त्याचे आयएसआयएस संघटनेशी संबंध असल्याचे दर्शवते.

तसेच मोहम्मद तारिकचा मुलगा माझ बिन तारीख याला देखील एटीएसने अलीगढ येथून अटक केली होती.त्याच्याकडून एक आयफोन, एक पेन ड्राईव्ह, एक अँड्रॉइड फोन आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेले हे दोघेही आयएसआयएस संघटनेशी संबंधित असून त्यांच्याकडून दहशतवादी असल्याचे अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहे, असे यूपी एटीएसकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version