पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी राजस्थानात स्फोटकांचा मोठा साठा सापडला

पोलिसांची केलेल्या कारवाईत एकाला अटक

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी राजस्थानात स्फोटकांचा मोठा साठा सापडला

पंतप्रधान मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे. त्यानंतर बारा तारखेला त्यांचा राजस्थान दौरा नियोजित आहे. मात्र या दौऱ्याआधी पोलिसांना राजस्थानच्या दौसा येथे संशयास्पद साहित्य,ज्यात ६५ डिटोनेटर्स , ३६० जिलेटीनच्या कांड्या , १३ कनेक्टिन्ग वायर्स इत्यादींचा समावेश आहे. दौसा येथून भांकरी रास्ता येथून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मुंबईत आज पंतप्रधानांचा दौरा आहे. मात्र नरेंद्र मोदी यांचा येत्या बारा फेब्रुवारीला राजस्थान दौऱ्यापूर्वी काल नऊ फेब्रुवारीलाच एक हजार किलो स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.

 

पंतप्रधान बारा फेब्रुवारीला राजस्थानात

राजस्थानातील दौसा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली मुंबई या एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करणार आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणांत असल्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलीस सुद्धा जागरूक असल्यामुळे हि स्फोटके जप्त करण्यात आली. काल गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.

एकूण किती स्फोटके जप्त

पोलिसांनी जप्त केलेल्या संशयास्पद साहित्यात एकूण ३६० जिलेटीनच्या कांड्या, १३ कनेक्टटिंग वायर्स, ६५ डिटोनेटर्स यांचा समावेश आहे. एका जिलेटीन काडीचे वजन जवळजवळ २. ७८ किलो इतके असते. म्हणजे १००० किलो स्फोटके जप्त करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

सागरी जैवविविधता आणि स्वच्छता मोहिमेसाठी सामंजस्य करार

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

हे सर्व भांकरी रस्ता येथून जप्त केले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव राजेश मीणा असे असून पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यावेळी अतिरेकी हल्ल्याचा कट होता असा संशय व्यक्त केला जातो. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अधिक माहिती लवकरच समोर येईल असे सांगण्यात येत आहे.  दरम्यान पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील विकास  कामांच्या उदघाटन प्रसंगी ते उपस्थित राहणार आहेत आणि दोन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करणार आहेत.

Exit mobile version