महाराष्ट्रात महिला अत्याचारांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच बीड जिल्ह्यातून एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी बलात्कार केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत सहा महिन्यांच्या काळात तब्बल ४०० जणांनी तिच्यावर अत्याचार केला आहे. विशेष म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरून गेला आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील या पीडितेचे काही दिवसांपूर्वी लग्न लावले गेले. पीडित मुलीच्या वडिलांनी तिचं एका तरुणासोबत बालविवाह लावून दिला होता. पण लग्नानंतर सासरी नवरा तिला सांभाळत नव्हता. म्हणून ही पीडित मुलगी पुन्हा आपल्या वडिलांकडे राहायला गेली. पण वडिलांनीही तीला आधार द्यायला नकार दिला.
हे ही वाचा:
पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती
‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’
आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका
चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज
त्यामुळे असहाय्य आणि बेघर झालेली ही अल्पवयीन मुलगी अंबाजोगाई बस स्थानकावर येऊन राहू लागली. या एकट्या मुलीला पाहून तिचा गैरफायदा घेण्यात आला. गेल्या सहा महिन्यात तब्बल ४०० जणांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणाची माहिती समोर येताच पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणी मुलीचा बालविवाह करून दिल्यामुळे वडिलांसह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अत्याचार करणाऱ्या तीन संशयित आरोपींवरही गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीचा पुरवणी जबाबही नोंदवला आहे.