24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामायाकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?

याकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?

याकुब मेमनच्या कबरीवर लायटिंग आणि संगमरवरी काम

Google News Follow

Related

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक रसद पुरविल्याच्या आरोपावरून याकुब मेमनला २०१५मध्ये फाशी देण्यात आले. दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याबद्दल आणि मुंबईतील २५० लोकांच्या मृत्युस कारणीभूत असल्याबद्दल एकाला फाशी दिली जाते आणि आज ७ वर्षांनी त्याची कबर सुशोभित केल्याचा मुद्दा समोर येतो, हे धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. अशा घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

मरीन लाइन्स येथे असलेल्या बडा कब्रस्तानमध्ये याकुब मेमनला दफन करण्यात आले होते. पण त्याच्या या कबरीवर फुले चढविण्यात आल्याचे, त्या कबरीला संगमरवर बसवून सुशोभित करण्यात आल्याचे आणि त्याला लायटिंग करण्यात आल्याचे व्हीडिओ, फोटो आता समोर येऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा बॉम्बस्फोट प्रकरणाची जखम हिरवी झाली आहे.

मुळात अशा एका दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या दोषी व्यक्तीची कबर सजविण्याची, त्याचे सुशोभीकरण करण्याची हिंमत केलीच कशी जाते. जे लोक या भयंकर आणि घृणास्पद अशा बॉम्बस्फोटात मारले गेले त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा अपमान नाही? एकीकडे अमेरिका ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन ठोकते आणि नंतर त्याचा मृतदेह कुठेतरी समुद्रात टाकून दिला जातो. पण भारतात अशा प्रवृत्तीचे महिमामंडन करण्यात येते, त्याची कबर सुशोभित करण्यात येते हे कशाचे लक्षण आहे?

यावर आता राजकारण सुरू झाले आहे. तुमच्या सरकारच्या काळात याकुबला दफनच का केले, त्याच्या मृतदेहाच्या बाबतीत ओसामासारखीच कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित करतात. मुळात हा प्रश्न नाही. प्रश्न आहे तो अशा व्यक्तीचा उदो उदो करण्याचा. ही कीड आपण का पोसतो आहोत. एकीकडे महाराष्ट्रावर वरवंटा फिरविणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात सजविली जाते, त्यावर चादर चढविली जाते, त्याचे दर्शन घेण्यासाठी अकबरुद्दीनसारखे राजकीय नेते जातात. अबू असिम आजमीसारखे नेते तर औरंगजेब हा चांगला राजा होता, त्याच्याबद्दल वाईट चित्र रंगवले गेले, असे म्हणतात. हे कसले लक्षण आहे?

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला इस्लामी आक्रमणापासून सुरक्षित केले, स्वराज्याची निर्मिती केली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून त्यांना मारण्याचे जो कारस्थान रचतो, त्या औरंगजेबाबद्दल आपल्याकडे सहानुभूती असते? ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले, त्याच्या कबरीबद्दल काही लोक आदर दाखवतात? महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे घडले. त्याबद्दल या तिन्ही पक्षांनी एक शब्दही काढला नाही. ही कुठली प्रवृत्ती आहे?  छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केल्यानंतर त्याचे दफन प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याच्या सूचना केल्या. पण याचा अर्थ त्याचा उदो उदो करण्यासाठी नव्हे तर शत्रुशी मृत्यूनंतर वैर संपते, त्याच्या मृतदेहाची विटंबना होऊ नये, त्याचे उचित अंत्यसंस्कार व्हावेत या हेतूने. पण महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या अफझल खानाची कबर सुशोभित केली जाते, तिथे चादरी चढविल्या जातात, नवस केले जातात. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले दुर्लक्षित ठेवायचे पण अशा कबरींना संरक्षण द्यायचे हा काय प्रकार आहे. महाराजांच्या किल्ल्यांवर लपूनछपून मजारी तयार केल्या जातात, तिथे लोक दर्शनाला येऊ लागतात, तिथे उरुस भरतात ही मानसिकता एकाचप्रकारची आहे.

हे ही वाचा:

शिर्डीमध्ये रेड अलर्ट, अहमदनगरमध्ये कलम १४४ लागू

मेमनच्या कबरीवरचे लाईट्स पोलिसांनी काढले

“पितृपक्षात बाळासाहेब खाली येतील आणि आम्ही धनुष्यबाण जिंकू”

विक्रांतनंतर आता ‘तारागिरी’ची प्रतीक्षा

 

याकुब मेमनचा या बॉम्बस्फोटात असलेला सहभाग लक्षात घेता त्याबद्दल कुणाला सहानुभूती कशी काय वाटू शकते? त्याला दफन करून आज ७ वर्षे लोटल्यावरही ही कबर सुशोभित केली जात असेल, तर त्याची लाज वाटायला हवी. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करायचे म्हटले तर काही लोकांना दुःख होते ते याकुबच्या कबरीच्या सुशोभीकरणाचे राजकारण करतात. आपल्यावर अन्याय केलेल्यांचे कोडकौतुक होत असेल, त्यांना आदर्श मानले जात असेल तर समाज षंढ बनला आहे का असा सवाल विचारावासा वाटतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा