ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशने (बीबीसी) २०१६ पासून कमी कर भरल्याचे मान्य केले असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांआधी बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली होती. यामध्ये कंपनीच्या मुंबई-दिल्ली कार्यालयांची तपासणी केल्यानंतर करचुकवेगिरीचे अनेक पुरावे देखील सापडले होते. यानंतर आता बीबीसीने कमी उत्पन्न दाखवून कर कमी भरल्याचे मान्य केले आहे.
बीबीसीने २०१६ ते २०२२ दरम्यान ४० कोटी रुपये कमी कर भरला. त्यामुळे ४० कोटी रुपयांचा कर जमा करण्यासाठी बीबीसीने अर्जही दाखल केला आहे. करचुकवेगिरीच्या आरोपांनंतर कंपनीने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे.
बीबीसीच्या कार्यालयांची पाहणी केली असता, आयकर विभागाने बीबीसीने दाखवलेले उत्पन्न भारतातील कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नसल्याचे सांगितले होते. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बीबीसीविरोधात चौकशी सुरू केली. ईडी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्टचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या आरोपांची चौकशी करत आहे. आयकर विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान बीबीसी ग्रुपने कमी उत्पन्न दाखवून कर वाचवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
मॉन्सूनचे आगमन १६ जूननंतर होणार!
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सत्रात मोदी दुसऱ्यांदा संबोधित करणार
वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची पत्रकाराला धमकी
आयकर विभागाने म्हटले की, सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, विविध भारतीय भाषांमध्ये (इंग्रजी व्यतिरिक्त) कंटेटचा पुरेसा वापर असूनही, समूहाने दाखवलेले उत्पन्न किंवा नफा कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नाही.