28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाकाल्हेर आलीमघर खाडीतील अवैध वाळू उत्खनन करणारे दोन बार्ज, ३ पंप नष्ट

काल्हेर आलीमघर खाडीतील अवैध वाळू उत्खनन करणारे दोन बार्ज, ३ पंप नष्ट

खारबाव तलाठी यांच्यामार्फत काल्हेर आलीमघर खाडीत कारवाई

Google News Follow

Related

जिल्हा महसूल यंत्रणेकडून भिवंडी तालुक्यातील काल्हेर आलीमघर खाडीत केलेल्या कारवाईत अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई करण्यात आली. यावेळी  २ बार्ज, ३ संक्शन पंप असा एकूण ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

खाडीमधील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांनी कडक कारवाई करण्याचे व गस्त घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसिलदार (रेती गट) राहुल सारंग व भिवंडी तहसिलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाचे फिरते पथक व भिवंडी तहसील कार्यालय, भिवंडी मंडळ अधिकारी व भिवंडी व खारबाव तलाठी यांच्यामार्फत काल्हेर आलीमघर खाडीत कारवाई करण्यात आली.

हे ही वाचा:

चांद्रयान-3; विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ !

दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

सुप्रिया सुळेंना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

भारताची चीनवर मात; चंद्राभोवती भारताची तीन सक्रिय अंतराळयाने

यामध्ये २ बार्ज, ३ संक्शन पंप आढळून आले. हे बार्ज व संक्शन पंपचे वॉल काढलेले असल्याने ते किनारी भागात आणणे शक्य नसल्याने जागेवर जाळून खाडीमध्येच बुडवून नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये अंदाजे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा