धक्कादायक! पुण्यात भरदिवसा दरोडेखोरांनी लुटली बँक!

धक्कादायक! पुण्यात भरदिवसा दरोडेखोरांनी लुटली बँक!

पुण्यात एका बँकेत भरदिवसा दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यामधील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत दरोडेखोरांनी दरोडा टाकून तब्बल दोन करोड रुपयांचे सोने आणि ३१ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील पिंपरखेड भागात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये गुरुवारी (२१ ऑक्टोबर) दुपारी दरोडा घालण्यात आला. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पुण्यातील या बँकेत दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून हा ऐवज लंपास केला आहे. दरोडेखोर २० ते १५ वर्षीय वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे. निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट घातलेले पाच ते सहा दरोडेखोर सिल्वर रंगाच्या मारुती सियाजमधून आले. बँकेतील कर्मचारी व ग्राहकांना पिस्तुलीचा धाक दाखवत त्यांनी तब्बल दोन करोड रुपयांचे सोने आणि ३१ लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या गाडीच्या पुढील बाजूस प्रेस असे लिहिलेले आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा:

एसआरपीएफ पोलिसाने केला गोळीबार; एक जण ठार

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

अभिमानास्पद! १०० कोटी लसीकरण पूर्ण

या गाडीतून आरोपी अहमदनगरच्या दिशेने पळून गेले आहेत. त्यानंतर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना, पोलिस ठाणे हद्दीतील सर्व पोलिस पाटील, ग्रामसुरक्षा दल आणि नागरिकांना ही गाडी आणि संशयित आढळल्यास तत्काळ मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version