वसईतील आयसीआयसीआय बँकेत दरोडा टाकून महिला व्यवस्थापकाची हत्या करणारा बँकेचा माजी अधिकारी अनिल दुबे याला वसईतून अटक करण्यात आली आहे. अनिल दुबे हा शुक्रवारी न्यायालयाच्या परिसरातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला होता. दुबे याला पळून जाण्यास मदत करणारा त्याच्या साथीदार चांद मेहबूब खान याला देखील वसई गुन्हे शाखेने अटक केली आहे.
मागील वर्षी जुलै महिन्यात विरारच्या आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. या बँकेचा माजी व्यवस्थापक असलेल्या अनिल दुबे याने हा दरोडा घालून महिला व्यवस्थापकाची हत्या करून सुरक्षा रक्षकाला जखमी केले होते, व बँकेची ३ कोटींची रोकड लुटून पोबारा केला होता. या दरोड्यात बँकेच्या महिला व्यवस्थापक योगिता वर्तक-चौधरी यांचा मृत्यू झाला होता तर श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी अनिल दुबे याला अटक करण्यात आली होती, व सध्या तो ठाण्याच्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता.
हे ही वाचा:
मेहबुबा मुफ्ती यांना २४ तासांत सरकारी घर खाली करावे लागणार
आफताबवर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप
मुंबईचे अग्निशमन दल चढणार प्रगतीची ऑस्ट्रेलियन ‘शिडी’
‘गांधी हत्येचे धागेदोरे हे काँग्रेसपर्यंत पोहोचतात’
शुक्रवारी त्याला वसई न्यायालयात आणण्यात आले होते, तेथून त्याला तुरुंगात घेऊन जात असताना त्याने न्यायालय परिसरातच लघुशंकेचे निमित्त करून पोलिसांच्या हातावर तुरु देऊन पोबारा केला होता. दरम्यान याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा कसून शोध घेण्यात येत होता. अनिल दुबे याला पळून जाण्यास तुरुंगातून नुकताच बाहेर पडलेल्या चांद खान याने मदत केली होती. वसई गुन्हे शाखेने अखेर सोमवारी पहाटे वसईतील एका ठिकानाहून अनिल दुबे आणि नालासोपारा येथून चांद शेख याला अटक केली आहे.