जेटच्या व्यवस्थापकांनी बँकेकडून घेतलेले कोट्यवधी रुपयांचे कर्ज पत्नी आणि मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवल्याचा आरोप ईडीने आरोपपत्रात केला आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोएल यांची पत्नी यांना १२ कोटी २० लाख तर, त्यांचा मुलगा निवान याला ‘सल्लागार सेवा’ म्हणून दोन कोटी ९० लाख रुपये देण्यात आले होते. मात्र जेटकडून या दाव्याला दुजोरा सादर करण्यात अपयश आले, असे ईडीने कॅनरा बँक घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
विशेष पीएमएलए न्यायालयाने गोयल (७४), त्यांची पत्नी (७१) आणि अन्य चार कंपन्यांविरोधातील आरोपपत्राची दखल घेतली. या आरोपपत्रात गोयल यांनी त्यांची पत्नी आणि दोन मुले आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून बँकेला मिळालेल्या कर्जाचा पैसा अन्यत्र वळवला, असे नमूद करण्यात आले आहे. गोयल यांना १ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती.
सुमारे पाच हजार ७०० कोटींची कर्जाऊ रक्कम गोयल यांची पत्नी यांच्या वैयक्तिक खात्यावर वळती झाली आणि तिचा वापर त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी करण्यात आला. कर्ज मंजूर झाले तेव्हा गोयल यांच्या पत्नी जेटच्या संचालक होत्या
आणि परदेशी खात्याच्या विश्वस्त होत्या. वेगवेगळ्या बँकांनी जेट एअरवेजला कर्ज मंजूर केले तेव्हा, अनिता गोयल या कंपनीच्या संचालकांपैकी एक होत्या. नंतर हे कर्ज निर्लेखित केल्याचे दाखवण्यात आले होते.
गोयल यांनी बनवलेल्या ट्रस्टची त्या ट्रस्टी-लाभार्थी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. करसवलत मिळणाऱ्या देशांत त्यांनी पैसे दडवल्याचा संशय आहे. गोयल यांची मुले निवान आणि नम्रता यांना गोयल यांच्या शिफारशीनुसार, जेटमध्ये नोकरी देण्यात आली होती. त्यात त्यांना वार्षिक पगार २५ लाख रुपये देण्यात आले होते. निवान हे महसूल व्यवस्थापन विभागात तर, नम्रता या केबिन क्रू विभागात कार्यरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘त्या दोघांनीही त्यांच्या करीअरची सुरुवात जेट एअरवेजपासून केली होती. ते दोघेही शिकण्याच्या टप्प्यात होते. मात्र, तरीही त्यांना कंपनीतर्फे आलिशान गाड्या देण्यात आल्या होत्या आणि त्यांचे वैयक्तिक खर्च कंपनीच्या खात्यातून वळते केले जात होते,’ असेही ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.
मात्र, तपास संस्थांनी निवान आणि नम्रताविरोधात आरोपपत्र दाखल केलेले नाही. ईडीने अनिवासी भारतीय असलेल्या निवान यांना नोटीस पाठवली होती. मात्र त्याने कोणत्याही नोटिशीला उत्तर दिले नाही. मात्र तोही या संपूर्ण घोटाळ्याचा लाभार्थी आहे. कारण नरेश गोयल आणि कुटुंबीयांनी जेट कंपनीच्या पैशांतून घेतलेल्या काही मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यात आल्या आहेत.
‘निवान सध्या कोणताच व्यवसाय करत नाही ना तो काही काम करत. त्याचा दैनंदिन खर्च नरेश गोयल यांनी त्यांच्या परदेशातील खात्यामध्ये खात्यामधून आणि करसवलत देणाऱ्या देशांमध्ये ठेवलेल्या ट्रस्टमधून दिल्या जाणाऱ्यापैशांतून केला जात आहे,’ असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. गोयल यांनी सुमारे ४० लाख डॉलर निवानला त्याच्या व्यापारासाठी दिले गेले होते.
हे ही वाचा:
डोंबिवलीत लहान मुलांच्या गेम झोनमध्ये पाचवर्षीय मुलाचा मृत्यू!
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण
हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार
कंपनीच्या तिकीट वितरणाच्या एजंटांना कमिशनपोटी वारेमाप पैसा दिल्याचे तपासात दिसून आले. एजंटांना देण्यात आलेले पैसे त्यांनी आपल्याच उपकंपन्यांना दिले होते व त्यांच्यामार्फत ते एंजंटांना दिल्याचे दाखवले होते. मात्र जेट समूहातील ज्या कंपन्यांना त्यांनी हे पैसे दिल्याचे दाखवले होते, त्या कंपन्या २००९पासून फारशा कार्यरत नव्हत्या. तरीही सातत्याने गोयल त्यात गुंतवणूक करत होते व त्यातील पैसे ते व त्यांचे कुटुंबीय वैयक्तिकरीत्या वापरत होते.