वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून एका बँक कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे.टॅक्सी चालकाने सांगितले की, प्रवाशाने आपला मोबाईल खाली पडला असे सांगितले.टॅक्सी चालकाने टॅक्सी बाजूला घेतल्यानंतर प्रवाशाने टॅक्सिमधून उतरून पुलावरून उडी मारली.वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारणारा २८ वर्षीय तरुण एक बँक कर्मचारी असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले.
आकाश सिंग (२८) असे मृत तरुणाचे नाव असून तो एक बँक कर्मचारी आहे व मुंबईतील परळ येथील रहिवासी आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री मृत आकाश सिंग हा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सीत बसला पण नंतर त्याने ड्रायव्हरला सी लिंकवर टॅक्सी घेण्यास सांगितले, असे वरळी पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले. टॅक्सी पुलावरून जात असताना प्रवासी आकाश याने टॅक्सी चालकाला आपला मोबाईल खाली पडला असे सांगितले.
हे ही वाचा:
अवघ्या २४व्या वर्षी अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू झाला निवृत्त
कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट; ५८० सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचा आदेश
“एअर ऍम्ब्युलन्स टेक ऑफ झाली नसती तर आयुष्याचं विमान लँड झालं नसतं”
यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार
त्यानंतर टॅक्सी चालकाने त्वरित गाडी बाजूला घेतल्यावर प्रवासी आकाश टॅक्सी मधून उतारला आणि पुलावरून समुद्रात उडी मारली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व आकाशची शोधमोहीम सुरु झाली.आकाशचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यास रात्री उशीर झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.प्राथमिक तपासानुसार, आकाश सिंग हा आपल्या आई-वडिलांसोबत राहत असून तीन महिन्यापूर्वी आकाशचे त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाले होते.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.