प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करणाऱ्या तीन घुसखोर बांगलादेशींना अटक!

दिल्ली पोलिसांची कारवाई 

प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करणाऱ्या तीन घुसखोर बांगलादेशींना अटक!

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने घुसखोर बांगलादेशींविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. शोधमोहिमे दरम्यान तीन बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले घुसखोर बांगलादेशी दिल्लीतील बवाना येथे प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होते. यांच्याकडून बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

गुन्हे शाखेच्या सायबर सेलचे पोलिस उपायुक्त आदित्य गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. मुस्ताक (७२), शाहिद खान (२८) आणि मिंटू (३२) अशी अटक केलेल्या घुसखोरांची नावे आहेत. हे सर्व दिल्लीतील बवाना येथे राहत होते.
सायबर सेलमध्ये तैनात असलेले इन्स्पेक्टर विवेकानंद आणि एसआय शबनम सैफी यांचे पथक बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी काम करत होते. याच दरम्यान, या घुसखोरांची गुप्त माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने बवाना येथे छापा टाकला आणि तिघांना अटक केली.
हे ही वाचा : 
पु. ल. देशपांडे कला अकादमीतील नवीन संकुलाचे ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ नामकरण
भाजपाच्या प्रयोगशाळेत, काँग्रेसचा प्रयोग…
सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘जमात’ आणि ‘हिजबुल’शी होते संबंध; केली हकालपट्टी!
गृहमंत्री शाह रायगड दौऱ्यावर, सुनील तटकरेंच्या निवासस्थानी करणार भोजन!
चौकशीदरम्यान, आरोपीने अखेर बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित असल्याची कबुली दिली. आरोपी शाहिद आणि मिंटू हे आरोपी मुस्ताकचे मुलगे आहेत. घुसखोरांनी खुलासा केला की बांगलादेशातून सीमा ओलांडून बेकायदेशीरपणे भारतात आले. यानंतर पश्चिम बंगाल आणि दिल्लीतील स्थानिकांनी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड सारखी बनावट कागदपत्रे बनविली.
अधिकाऱ्याने सांगितले की, ते प्रथम पश्चिम बंगालला पोहोचले आणि तिथून दिल्लीला पोहोचले. दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी राहिल्यानंतर बवाना येथील सीएचएचडब्ल्यू कॉलनीमध्ये स्थायिक झाले आणि गेल्या अनेक वर्षांपासून तिथे राहत आहेत. घुसखोर सध्या त्याच्या परिसरात प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होते. दरम्यान, आता तिघांनाही अटक करण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे.
Exit mobile version