29 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
घरक्राईमनामाबांगलादेशी युट्युबर शिकवतोय, पासपोर्ट- व्हिसाशिवाय भारतात कसे घुसायचे

बांगलादेशी युट्युबर शिकवतोय, पासपोर्ट- व्हिसाशिवाय भारतात कसे घुसायचे

व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

Google News Follow

Related

गैरमार्गाने बांगलादेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भारतासाठी हा डोकेदुखीचा विषय ठरलेला असताना एका व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असताना वर्षभरापूर्वीच्या एका व्हिडीओमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा एक यूट्यूब व्हिडीओ असून यातील यूट्यूबर बांगलादेशी असल्याचे बोलले जात आहे. या यूट्यूबरने व्हिडीओमध्ये बांगलादेशमधून भारतात कोणताही पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय कसं जायचं, यासंदर्भात माहिती दिली आहे. संपूर्ण व्हिडीओ शूट करून त्याने भारतात येण्याचा मार्ग दाखवला आहे. अनेक ठिकाणी तो जमिनीखालच्या पाईपलाईनमधूनही प्रवास करत आहे. यूट्यूबरच्या व्हिडीओवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, या यूट्यूबरने आपल्या व्हिडीओमध्ये बांगलादेशातून भारतात कोणत्याही पासपोर्ट वा व्हिसाशिवाय छुप्या मार्गाने जाणं शक्य असल्याचा दावा केला आहे. हे अत्यंत धोकादायक असून या युट्युबरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिवाय सीमाभागातही केंद्र सरकारने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा..

स्टार हाऊसिंग फायनान्सची दणदणीत वाटचाल

“ममता बॅनर्जी यांनी खोट्या गोष्टींवर आधारित कथा तयार करण्याऐवजी खरे बोलावे”

संतांवर जातीय टीका करणाऱ्या मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा

जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी

बांगलादेशी युट्युबरने बॉर्डर क्रॉसिंगद्वारे भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश कसा करायचा याची संपूर्ण माहिती २१ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. या भागात कोणतेही कुंपण किंवा भिंत दिसत नाही. त्यानंतर तो भारतीय भूमीत फिरत राहतो आणि काही अंतरावर कुंपण दाखवतो. पुढे पाइपलाईन दाखवून तो म्हणतो की, लोक या पाइपलाईन्समधून आत जाऊ शकतात आणि हा भारताचा थेट मार्ग आहे. शेवटी, तो व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय प्रवेश न करण्याबद्दल बोलतो आणि इशारा देतो की, असे करणे धोकादायक असू शकते आणि जोखीम व्यक्तीवर असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा