मालवणीमध्ये बांग्लादेशी महिलेने थाटला ड्रग्सचा व्यापार

मालवणीमध्ये बांग्लादेशी महिलेने थाटला ड्रग्सचा व्यापार

मलाड मधील मालवणी हा भाग पुन्हा एकदा नको त्या कारणासाठी चर्चेत आला आहे. मालवणीमध्ये दिवसाढवळ्या एक बाई आपल्या घरातून ड्रग्सचा व्यवसाय करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा एक व्हिडिओ देखील सध्या समाज माध्यमांवर फिरत आहे. या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या विरोधात कारवाई करणार का? याकडे मालवणी भागातील जागरूक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मालवणी भागात अनेक प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय चालतात अशी चर्चा कायमच रंगलेली दिसते. यामध्ये ड्रग्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असल्याचीही कुजबुज असते. अशाच एका प्रकरणाची तक्रार काही दिवसांपूर्वी प्रीती राऊत नावाच्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. या संदर्भात केंद्रीय गृह खात्याने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत राज्य पोलिसांना त्वरित चौकशी करण्यात सांगितले आहे. या विषयात प्रीती राऊत यांना मालवणी भागातील पोलीस उपायुक्तांनी बोलवून त्यांचा जबाब नोंदवला आहे.

हे ही वाचा:

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्त करा!

पडदा केव्हा उठणार?

प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

मालवणी भागात ड्रग्स व्यवसाय करणारी महिला ही मूळची बांगलादेशची असल्याचाही दावा केला जात आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक झाले आहे. अशा परिस्थिती महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात कडक कारवाई करावी अशी अपेक्षा मालवणीत स्थानिक नागरिक करत आहेत. दरम्यान मालवणी पॅटर्न या ट्विटर हॅण्डलवरून या घटनेची माहिती देण्यात आली असून या बांग्लादेशी महिलेचा ड्रग्स विकतानाचा व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे.

Exit mobile version