ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथून पोलिसांनी एका पॉर्नस्टारला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ही पॉर्नस्टार बांगलादेशी असून बनावट कागदपत्रांच्या सहायाने ती वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे, या पॉर्नस्टारचे संपूर्ण कुटुंबच बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक म्हणून वावरत असल्याचे समोर आले आहे. रिया बर्डे या नावाने ही तरुणी उल्हासनगरमध्ये वास्तव्यास होती.
रियाला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. रिया बर्डे हिच्यावर बनावट कागदपत्रांद्वारे भारतात राहिल्याचा आरोप असून या आरोपामुळे तिला उल्हासनगर येथील हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
माहितीनुसार, रियाची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख हिने अमरावतीतील अरविंद बर्डे नावाच्या एका व्यक्तीशी भारतीय कागदपत्रे मिळावीत म्हणून विवाह केला होता. रियाचा भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख हे सर्व बर्डे नाव लावून भारतीय झाले होते. प्रकरणी आयपीसी ४२०, ४६५, ४६८, ४७९, ३४ आणि १४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया मूळची बांगलादेशी असून तिची आई, भाऊ आणि बहीण बनावट कागदपत्रे बनवून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणात रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे.
हे ही वाचा :
आसाम आयईडी प्रकरण: एनआयएकडून उल्फा (आय) च्या कार्यकर्त्याला अटक
इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या हवाई दलाचा कमांडर ठार
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला?, समितीचा अहवाल आला समोर!
आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रियाची आई- वडिल दोघेही सध्या कतारमध्ये वास्तव्यास असून रिया इथे तिची बहीण आणि भावासोबत राहत होती. पोलिसांनी रियाला ताब्यात घेतलं असून तिच्या बहिणीचा आणि भावाचा शोध चालू आहे. रियाच्याचं एका मित्रामुळे रिया बांगलादेशी असल्याचे प्रकरण उघडकीस आले. रियाचा मित्र प्रशांत याला अचानक एक दिवशी रिया बांगलादेशची रहिवासी असून भारतात बेकायदेशीररीत्या राहात असल्याचं समजलं. त्यानंतर त्याने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी रियाची कागदपत्रं तपासून कारवाई सुरू केली.