नालासोपारा येथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नालासोपारा येथील अचोले पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका घुसखोर बांगलादेशीला अटक केली आहे. ही कारवाई डीसीपी क्राइम अविनाश अंबुरे आणि एसीपी (प्रशासन) भास्कर पुकळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली, ज्यामध्ये पोलिस निरीक्षक सौरभी पवार आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौरभी पवार यांनी सांगितले की, बुधवारी (१७ एप्रिल) मानव तस्करी विरोधी पथकाने नालासोपारा येथून एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली. आमच्या पथकाने आतापर्यंत ९ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, ज्यात महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.
पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, एका खबऱ्याकडून माहिती मिळाली की एक बांगलादेशी नागरिक या भागात बेकायदेशीरपणे राहत आहे. यानंतर, पोलिस पथकाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला आणि रफीफुल सुलतान मुल्ला नावाच्या बांगलादेशी नागरिकाला अटक केली.
तो परवानगीशिवाय भारतात राहत असल्याचे उघड झाले आणि आरोपीने आपण बांगलादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अचोले पोलिस ठाण्यात भारतीय पासपोर्ट कायदा, १९५० च्या कलम ३(अ), ६(अ) आणि परदेशी कायदा, १९४६ च्या कलम १४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, युक्रेनमध्ये युद्धविराम शक्य!
उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी संपूर्ण गावालाच चपला पाठविल्या, कारण काय?
अमेरिकेने येमेनमधील इंधन बंदरावर केलेल्या हल्ल्यात ३८ ठार
छत्तीसगडमध्ये ३३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; १७ जणांवर ४९ लाखांचे बक्षीस
दरम्यान, अलिकडच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशींविरुद्ध मोठी मोहीम सुरू केली आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकले आहेत. ही मोहीम विशेषतः अशा भागात सुरू करण्यात आली आहे जिथे बेकायदेशीर स्थलांतरित मोठ्या संख्येने आढळतात. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे, करत आहेत. अटक करण्यात आलेल्यांची कागदपत्रे तपासली असता, येथे मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याचे समोर आले आहे. अशा घुसखोरांना पकडण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे.