मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर नागरिकास अटक

सापळा रचत पोलिसांनी बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे.

मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोर नागरिकास अटक

मुंबईमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या घुसखोर बांगलादेशी नागरिकांना शोधून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार, मुंबईमधून एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे.

मुंबईमधील बोरिवली येथून हा प्रकार उघडकीस आला आहे. बोरिवलीमधील एम.एच.बी कॉलनी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही घुसखोरी नागरिक नेहमी ये-जा करत असतात, अशी माहिती त्यांनी मिळाली. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी अटक केली आहे.

गोपनिय माहिती प्रमाणे बांगलादेशी घुसखोर इसम हा गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड, बोरीवली पश्चिम, मुंबई या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड, बोरीवली पश्चिम मुंबई या ठिकाणी एका संशयीत इसमासाठी सापळा रचुन त्यास अटक केली आहे. त्यास त्याचे नाव व मुळ गाव व भारतीय नागरिकत्वाबाबतचे पुरावे मागितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या एकंदर बोली भाषेवरुन तो परदेशी नागरीक असल्याची खात्री झाली.

पुढे दोन पंचांना पाचारण करून त्यांच्या समक्ष त्याला विश्वासात घेवून त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने खरी उत्तरे दिली. त्याचे नाव मुनीर बाबू मुल्ला उर्फ शेख, वय ३१ वर्ष, व्यवसाय- कडिया, रा. ठी, चंडिका मंदिर जवळ, चंद्रपाडा, सुकाला, नायगाव पूर्व, जिपालघर, मुळगाव- बिलबावास, थाना- कालिया, जिल्हा खुलना, राज्य-खुलना, देश- बांगलादेश असे सांगितले. तसेच तो मुळचा बांग्लादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच तो बांगलादेश मार्गे भारताच्या सरहद्दीवरील गस्ती पथकाची नजर चुकवून मुलखी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय भारतात प्रवेश करुन कलकत्ता मार्गे मुंबईत प्रवेश केल्याचे सांगितले आहे.

हे ही वाचा:

 हिजाबविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल फुटबॉलपटूला फाशीची शिक्षा

अमित शहांचा सल्ला, ‘सीमाभागावर दावे नकोत’

धक्कादायक! दहा ते १७ वयोगटातील दीड कोटी मुले व्यसनाधीन

श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारची समिती

त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या विरुद्ध एम एच बी कॉलनी पोलीस ठाणे विस्था. वी.स्था. गु.र.क्र. ११४१/२०२२, कलम- नियम ३ सह ६ पारपत्र (भारतात प्रवेश) १९५० परिच्छेद ३ (१) (अ) परकीय नागरिक आदेश १९४८ सह कलम १४ परकिय नागरिक कायदा १९४६ अन्वये नोंद करुन नमुद गुन्हयात त्यास गुरुवार, १५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version