कर्नाटकमधील शिमोगामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी २० फेब्रुवारी रोजी रात्री हा प्रकार घडला. हर्षा या २६ वर्षीय कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे सध्या या भागामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता.
कर्नाटक राज्यात सध्या भगवा आणि हिजाब यामध्ये वाद सुरू आहे. त्यातच थेट बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या खुनामुळे हा तणाव आणखी वाढला आहे. बजरंग दलाच्या २६ वर्षीय हर्षा या कार्यकर्त्याची रविवारी संध्याकाळी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप या प्रकरणाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही.
हर्षा याची हत्या झाल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. हिजाब विरोधी पोस्ट केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हा हल्ला कोणी केला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अस्पष्ट आहेत.
हे ही वाचा:
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा प्रश्न ‘केंद्र’स्थानी
न्यायालयाच्या बाहेर वाहनांमध्ये बसून नोटरी व्यवसाय नको!
मिठागराच्या जमिनीवर सेना आमदार उभारणार थीम पार्क?
तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना का भेटत आहेत?
कर्नाटकात हिजाबवरुन वाद सुरु असून या वादात बजरंग दलाची देखील आक्रमक भूमिका आहे. त्यामुळे या हत्येनंतर या प्रकरणाला हिजाबच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.