मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल असलेल्या मनी लॉंड्रिग प्रकरणात सचिन वाझे देखील आरोपी होता. परंतु या गुन्ह्यात अद्याप वाझेंना अटक झाली नव्हती.
मनी लॉंड्रिग प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने वाझेला जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी वाझेचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे.
मनी लॉंड्रिग प्रकरणासह अन्य आरोपाखाली सचिन वाझे तुरुंगात आहेत. ईडीने वाझेवर गुन्हा दाखल केला होता. वाझेने सीआरपीसी कलम ८८ नुसार जामीन मिळावा, यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी वाझेच्या जामीनावर सुनावणी पूर्ण झाली होती. त्याचा आज निकाल जाहीर झाला आहे. ईडीने वाझेच्या या जामीनासाठी विरोध केला होता. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने सचिन वाझेला जामीन मंजूर केला आहे. वाझेला जामीन मंजूर झाला असला तरी इतर प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने सध्यातरी वाझेचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहे.
हे ही वाचा :
आफताबने केलेल्या मारहाणीमुळे श्रद्धा दोन वर्षांपूर्वी ‘ऍडमिट’ होती
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एर्टिगा कारचा झाला चक्काचूर, पाच जणांचा मृत्यू
कर्नाटक सरकारचा ‘गो रक्षणा’साठी मोठा निर्णय
मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा
दरम्यान, या कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य आरोपींविरोधात असलेली माहिती देण्याची तयारी सचिन वाझेने दाखवली आहे. त्यामुळे सचिन वाझेला कथित भ्रष्टाचार प्रकरणात माफीचा साक्षीदार करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्या आदेशानुसार मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे गोळा केल्याचा खुलासा वाझेंनी तपासादरम्यान केला होता.