25 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामा‘आप’चा पाय आणखी खोलात; स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारचा जामीन नाकारला

‘आप’चा पाय आणखी खोलात; स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारचा जामीन नाकारला

दिल्लीतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला निर्णय

Google News Follow

Related

आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आप पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार याने स्वाती यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी बिभव कुमार याला अटक केली होती. त्यानंतर बिभव कुमार याचा जामीन अर्ज दिल्लीतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सोमवार, २७ मे रोजी फेटाळला असल्याची माहिती आहे.

बिभव कुमार यःच्यावर १३ मे रोजी नवी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याला २४ मे रोजी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. स्वाती मालीवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्या अरविंद केजरीवालांना भेटण्यासाठी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी गेल्या होत्या. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या बिभव कुमारने आरडाओरडा करत त्यांना धमकावले आणि त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली. तसेच क्रूरपणे मारहाण देखील केली. शिवाय त्यांचे डोके सेंटर टेबलवर आपटले.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आपल्या रिमांड अहवालात म्हटले आहे की, हे एक गंभीर प्रकरण असून हा पाशवी हल्ला घातक ठरू शकतो. तसेच बिभव कुमार हा तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. हे एक अतिशय गंभीर प्रकरण आहे जिथे संसद सदस्य, सार्वजनिक व्यक्तीवर क्रूरपणे हल्ला केला गेला आहे जो प्राणघातक असू शकतो. विशिष्ट प्रश्न असूनही, आरोपीने तपासात सहकार्य केले नाही आणि त्याच्या उत्तरांमध्ये टाळाटाळ केली, असे पोलिसांनी न्यायालयात यापूर्वी सांगितले होते.

गेल्या आठवड्यात, विभव कुमारला त्याच्या फोनमधील डेटाचा शोध घेण्यासाठी मुंबईला नेण्यात आले होते. त्याने अटक करण्यापूर्वी एक फोन फॉरमॅट केला होता. कुमारने आपला फोन फॉर्मेट केल्यानंतर त्याचा डेटा मुंबईतील एखाद्या व्यक्तीकडे किंवा डिव्हाइसला ट्रान्सफर केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केजरीवाल यांच्या घरातील फोन आणि लॅपटॉप आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

हे ही वाचा:

अग्निवीरांना आता मिळणार करसवलतीचा लाभ

२० बंगलादेशींना ८ महिने तुरुंगवास

वेदांतच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल करण्यासाठी पैसे पुरवणाऱ्याला अटक

मुलींची बाजी, कोकण ‘गुणवत्ता यादीत’ अव्वल

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी दावा केला की, मालीवाल तेथे पोहोचल्यानंतर कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले. त्याला कोणाच्या निर्देशाने बोलावण्यात आले, याचा तपशील आयोगाने मागवला. राष्ट्रीय महिला आयोगाने एका निवेदनात मुख्यमंत्र्यांसह सर्व गुंतलेल्या व्यक्तींच्या कॉल डिटेल रेकॉर्डची (सीडीआर) चौकशी करण्याची मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा