चारकोप येथील नर्सरीच्या मोकळ्या जागेत पुरलेले २० दिवसांचे स्त्री जातीचे मूल मंगळवारी रात्री सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे मूल रात्रीच्या वेळी पुरत असताना एका जोडप्याला काही लोकांनी बघितले होते अशी माहिती समोर आली आहे. या अनोळखी जोडप्या विरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
कांदिवली पश्चिम चारकोप येथील क्रांतीज्योती उद्यानाजवळ असलेल्या एका नर्सरीच्या मोकळ्या जागेत मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एका जोडप्याना संशयास्पदरित्या फिरताना एका व्यक्तीने बघितले होते, हे जोडपे ज्या वेळी नर्सरीतून बाहेर आले,त्यावेळी त्याच्या जवळ पांढऱ्या कापडात असलेली वस्तू दिसून आली नाही.
सदर इसमाने रात्री कामावरून घरी आल्यानंतर नर्सरीच्या मालकाकडे चौकशी केली असता त्याला याबाबत काहीच माहीत नसल्यामुळे त्यांनी नर्सरीच्या आत जाऊन तपासले असता त्या ठिकाणी त्यांना माती उकरलेली आढळून आली.
हे ही वाचा:
आठ महिन्यांनी चिनी कबुतराची पिंजऱ्यातून सुटका
महाविकास आघाडी समावेशात प्रकाश आंबेडकर अजूनही ‘वंचित’!
क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानात असे काय प्यायला की, त्याला उलट्या सुरू झाल्या!
कर्नाटक: टिपू सुलतानच्या फोटोला चपलेचा हार!
संशय येताच नर्सरी मालकाने चारकोप पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचांच्या समोर माती उकरूली असता पोलिसांना एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले लहान मृत मुलं आढळून आले. पोलिसांनी स्त्री जातीचे मुलं ताब्यात घेऊन तपासणीसाठी शताब्दी रुग्णालय येथे पाठविण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० दिवसांचे मृत स्त्री जातीचे मृत मुलं अनोळखी जोडप्याने ते पुरावा नष्ट करण्याचा हेतूने ते पुरले, या प्रकरणी अनोळखी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघाचा शोध घेण्यात येत आहे.