‘झुंड’ चित्रपटातील बाबूला नागपूर पोलिसांनी केली अटक

अभिनेत्याला चोरीच्या आरोपाखाली केली अटक

‘झुंड’ चित्रपटातील बाबूला नागपूर पोलिसांनी केली अटक

चित्रपट सृष्टीमध्ये सर्वच नवीन कलाकारांना बॉलीवुडचे शहेनशाहा अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज अभिनेत्या बरोबर काम करण्याची इच्छा असते, बरं या नव्या अभिनेत्याची शहेनशाहा सोबत पहिल्याच चित्रपट निर्मितीमद्धे काम करण्याची इच्छाही पूर्ण होते. चित्रपट प्रदर्शित झाल्या नंतर मिळालेल्या प्रसिद्धीनेच तो नाव लौकिक झाला. मात्र यांच अभिनेत्याला पोलिसांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्या प्रकरणी झुंड चित्रपटामध्ये बाबू ही व्यक्तिरेखा सकारणारा १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रिय याला गुरुवारी नागपूर पोलिसांनी अटक केली आहे.

झुंड हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. तर झुंड’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा सहकलाकार प्रियांशू क्षत्रिय याला पोलिसांनी चोरी प्रकरणात अटक केली आहे. नागपूरमधील मनकापूर भागातील रहिवासी असलेल्या ६४ वर्षीय प्रदीप मोंडावे यांनी तक्रार दिली होती. मोंडावे कुटुंबाच्या नागपुरातील राहत्या घरातून सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याचा आरोप आहे.

संबंधित घटनेमध्ये एका अल्पवयीन तरुणाला चोरी संबंधीत पडकले होते. नंतर चौकशी करत असताना या गुन्ह्यामध्ये प्रियांशू क्षत्रियचा सुद्धा सहभाग असल्याचा दावा केला. त्यानंतर मंगळवारी नागपूर पोलिसांनी प्रियांशू क्षत्रिय याला अटक करून, न्यायालयात हजर केले असता, २५ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे राज्यपालांवर घसरले!

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जी, तिघांना अटक

 परवानगीशिवाय अमिताभ बच्चन यांचा फोटो आणि आवाज वापरता येणार नाही!

पोलिस भरतीची तयारी विसरून तो चोर बनला!

झुंड चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या गड्डीगोदाम या भागात ही चोरी झाली आहे. या परिसरातील एका पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर झुंड हा हिंदी भाषेतील चित्रपट विजय बारसे या माजी क्रीडा शिक्षकाच्या जीवनावर आधारित असून, त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी फुटबॉलशी परिचय करुन दिला.

Exit mobile version