27 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरक्राईमनामाछत्तीसगड मधील बलात्कार, खून प्रकरणात बाबा खान अटकेत!

छत्तीसगड मधील बलात्कार, खून प्रकरणात बाबा खान अटकेत!

Google News Follow

Related

छत्तीसगडमध्ये घडलेल्या एका हादरवून टाकणाऱ्या हत्याकांडामध्ये एका तरुण मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिने कुठेही तक्रार करू नये यासाठी तिचा खून करण्यात आला. या सर्व प्रकरणात छत्तीसगड पोलिसांनी शब्बीरअली खान ऊर्फ बाबा खान याला अटक केली आहे.

छत्तीसगडमधील सुरजपूर जिल्ह्यात २४ मार्च रोजी ही घटना घडली. ज्यामध्ये मुलीचा खून करून तिचा मृतदेह पंख्याला लटकवण्यात आला. जेणेकरून हि आत्महत्या भासावी. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही मुलगी बारावीत शिकणारी विद्यार्थिनी असल्याची माहिती समोर आली आहे. २४ मार्च रोजी तिची प्रयोग परीक्षा देऊन सूरजपुर मधील निवासस्थानी परत आली होती. तिच्या वडिलांवर बिलासपूर येथे अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची आई, वडिलांची काळजी घेत त्यांच्या सोबत होती. तर लहान भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता.

जेव्हा लहान भाऊ खेळून परत आला तेव्हा त्याने दार ठोठावले. पण कोणी दरवाजा उघडला नाही. त्याने अथक प्रयत्न करून देखील दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी शेजारच्यांना बोलवले. जेव्हा हरप्रकारे प्रयत्न करून तेही दरवाजा उघडू शकले नाहीत. सर्व्ह त्यांनी जबरदस्ती हा दरवाजा तोडला आणि घरात शिरले. त्यावेळी त्यांना पंख्याला लटकलेला तरुणीचा मृतदेह सापडला.

हे ही वाचा:

‘गुन्हेगारी प्रक्रिया विधेयक २०२२’ संसदेत सादर!

हिंदू अल्पसंख्याक प्रकरणाचे शपथपत्रच सॉलिसिटर जनरलनी पाहिले नाही

नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पाच लाख लोकांनी केला गृहप्रवेश

राष्ट्रवादीचे नेते मेमन म्हणतात, मोदींच कौतुक करायलाच हवं

या घटनेची माहिती ताबडतोब स्थानिक पोलीस ठाण्यात कळवण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला. यातूनच संशयाची प्रत्येक सुई शब्बीर अली ऊर्फ बाबा खान याच्याकडे जात होती. यानंतर पोलिसांनी बाबा खान याला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्याला ही मुलगी घरात एकटी आढळली असून त्याची वासना जागृत होऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. तीने हा सर्व प्रकार कोणाला सांगू नये यासाठी त्याने तिची निर्दयीपणे हत्या देखील केली आणि ओढणी वापरत मृतदेह पंख्याला लटकवला जेणेकरून हा खून आत्महत्या वाटावी.

पोलिसांनी या प्रकारात खून आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच जर ही मुलगी अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्यास या प्रकरणात पॉस्को कायद्याची कलमेही लावण्यात आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा