शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती, पण ती पुढे ढकलण्यात आल्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आता १३ ऑक्टोबरला सुनावणी होणार असून बुधवारपर्यंत आर्यन खानला तुरुंगातच राहावे लागेल. तोपर्यंत एनसीबीने आपले म्हणणे न्यायालयात मांडावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
महानगर दंडाधिकाऱ्यांनी आर्यन खानला जामीन देण्यास नकार दिल्यानंतर सत्र न्यायालयात त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. सोमवारी आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.या अर्जावर आज सुनावणी होऊन जामीन मिळण्याची शक्यता होती. पण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अद्याप त्यांचे म्हणणे न्यायालया न मांडल्याने आर्यन खानचा हा मुक्काम वाढणार आहे.
यापूर्वी, अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला होता, हा अर्ज कायम ठेवण्यायोग्य नव्हता कारण केवळ सत्र न्यायालयाला जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर,आर्यन खानने जामीन मिळवण्यासाठी एनडीपीएस कायद्याअंतर्गत विशेष न्यायालयात धाव घेतली आहे.
हे ही वाचा:
काश्मीरच्या पुंछमध्ये ५ जवान हुतात्मा
‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी अंतराळ क्षेत्रात खासगी गुंतवणूक हवी’
लखीमपूर प्रकरणातील दुसऱ्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रा यांचे नाव नाही
टी- २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्या संघाला मिळणार ‘इतकी’ रक्कम
कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जो छापा घातला होता, त्यात आर्यन खानसह काही लोकांना अटक करण्यात आली. एकूण १४ लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील काही लोकांना नंतर चौकशी करून सोडून देण्यात आले. एनसीबीने या छापेमारीत जप्त केलेले ड्रग्स, रोकड, ताब्यात घेतलेले क्रूझवरील लोक याविषयी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती.