23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाअविनाश भोसलेचे 'हेलिकॉप्टर' सीबीआयने आणले जमिनीवर

अविनाश भोसलेचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने आणले जमिनीवर

Google News Follow

Related

पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडील ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सीबीआयने जप्त केले आहे. दिवाण हाऊसिंग (डीएचएफएल) घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप भोसलेंवर आहे. ३४ हजार कोटींचा हा घोटाळा आहे. पुणे येथील भोसले यांच्या घरातून हे हेलिकॉप्टर जप्त करण्यात आले आहे.

या बँक घोटाळ्यातील विविध संपत्तींवर सीबीआयने छापेमारी सुरू केली असून त्याअंतर्गत ही जप्ती केलेली आहे.

डीएचएफएलचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान, संचालक दीपक वाधवान आणि इतरांवर २० जूनला गुन्हा दाखल करण्यात आला. यूनियन बँकेच्या नेतृत्वाखालील १७ बँकांच्या समुहाला त्यांनी फसविल्याचा आरोप आहे. ३४ हजार ६१५ कोटी रुपयांची कर्जे त्यांनी डीएचएफएलकडे वळविल्याचे समोर आले होते. हा जनतेचा पैसा वळविण्यासाठी त्यांनी बनावट कंपन्यांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले होते. भोसले यांच्या एबीआयएल इन्फ्राप्रोजेक्ट्सचा या हेलिकॉप्टरमध्ये हिस्सा आहे. भोसले यांनी २०१८ मध्ये लंडन येथे १००० कोटींची मालमत्ता खरेदी केलेली आहे. त्यातील ३०० कोटी त्यांनी दिले तर ७०० कोटी हे येस बँकेकडून कर्ज घेऊन दिले, असे सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे. डीएचएफएलकडून मिळालेल्या पैशातून लंडनमधील ही मालमत्ता भोसले यांनी विकत घेतली आहे.

हे ही वाचा:

यंदा राखी खरेदीसाठी बहिणींना मोजावे लागणार ज्यादा पैसे

मॅकेनिकल इंजिनियरचा सहभाग देशविरोधी कारवायात असल्याचा संशय

तिस्ता सेटलवाड आणि श्रीकुमार यांना दिलासा नाहीच

एकनाथ शिंदेंनी रणशिंग फुंकले

 

वाधवान बंधूंकडून सीबीआयला ५५ कोटींची पेन्टिंग्ज आणि ५ कोटींची दोन घड्याळेही मिळाली आहेत. नुकत्याच केलेल्या छापेमारीत त्यांना २ कोटींचे सोने आणि हिऱ्यांचे दागिनेही मिळाले आहेत. वाधवान बंधूंची चौकशी केल्यावर जवळपास १२.५ कोटींची ही संपत्ती सापडली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा