नवी मुंबईत का आहे रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण?

नवी मुंबईत का आहे रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण?

रस्ते मार्गे प्रवास करणे हे नवी मुंबईकरांसाठी आता धोक्याचे झालेले आहे. शहरामध्ये दिवसागणिक अनेक चोरीच्या घटना  घडू लागलेल्या आहेत. प्रवासी बनून तसेच वाहन रस्त्यावर अडवून चोरीचे प्रकार सध्याच्या घडीला नवी मुंबई भागामध्ये वाढत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. गेल्याकाही दिवसांमध्ये झालेल्या दोन घटनांमध्ये दोन रिक्षाचालक व एक डंपरचालक जखमी झालेला आहे. या टोळ्या मानखुर्द मधून कार्यरत असल्याचा संशय आता व्यक्त होत आहे. ही टोळी रिक्षाचालकांकडे प्रवासी म्हणून जाते आणि त्यांच्यावर वार करते. त्यातून जे हाती लागेल ते लुटण्याचा प्रयत्न करते.

तुर्भे येथील रिक्षाचालक किरण बोराडे यांच्यावरही नुकताच चाकूने वार करण्यात आला होता. ही घटना नुकतीच घडलेली असून, ते रात्री रिक्षाने भाडे घेऊन परतत होते. त्यावेळी ते मुंबई परिसरातून घरी नवी मुंबईत येत होते. त्यावेळी मानखुर्दमध्ये एक पुरुष व एक बुरखाधारी महिला भेटली. त्यांनी उलवेला जायचे आहे असे सांगून रिक्षात बसले. परंतु पाम बिच मार्गे जाण्याऐवजी त्यांनी रिक्षा बेलापूरमार्गे नेण्यास सांगितली. त्यानंतर प्रवासी म्हणून बसलेल्या या व्यक्तीने रिक्षाचालक किरण यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली.

 

हे ही वाचा:

महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार

भिवंडी अग्निशमन दलात सुधारणांची बोंब; केवळ चारच बंब

मुकेश अंबानी यांचे ७-इलेव्हन लवकरच मुंबईत

महिलांसाठी हा घेण्यात आला ‘बेस्ट’ निर्णय

 

बोराडे या चोरांच्या तावडीतून निसटले आणि त्यांनी एका दुचाकीस्वाराला थांबवले. दुचाकीस्वाराला घडलेला प्रकार सांगून त्यांनी अखेर रुग्णालय गाठले. अशीच घटना उरण मार्गावरील एका डंपरचालकासोबतही घडली होती. त्यामुळेच सध्याच्या घडीला या भागातील रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळेच लांबचे भाडे घेण्यासाठी आता इथले रिक्षाचालक तयार होत नसल्याचे दिसत आहे.

Exit mobile version