राज्यात पुन्हा औरंगजेब ‘नाचला’

अहमदनगरमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा

राज्यात पुन्हा औरंगजेब ‘नाचला’

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात संभाजीनगरमध्ये उरुसाच्या निमित्ताने औरंगजेबाचे पोस्टर नाचविण्याचा प्रकार झाला होता. आता त्याची पुनरावृत्ती अहमदनगरमध्ये झाली आहे. या जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर असे करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता तिथे झालेल्या एका उरुसात औरंगजेबाचे पोस्टर नाचविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अहमदनगर येथील फकीरवाडा भागात दर्ग्याच्या संदलचा कार्यक्रम झाला. त्यात एमआयएमचे शहराध्यक्ष सरफराज जागीदार यांच्यासह अनेकांनी औरंगजेबाचे फोटो नाचविले आणि आनंद साजरा केला. अनेक युवकांच्या हातात औरंगजेबाचे फोटो दिसल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भिंगार पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरफराज यांच्यासह अथनान शेख, शेख सरवर, जावेद शेख यांच्याविरोधात हे गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर पाटील यांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवणारे हे शिवद्रोही आहेत असे म्हटले आहे. औरंगजेबाचा पुळका ज्यांना असेल त्यांनी पाकिस्तानात जावे असे भोर पाटील यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

आज शिवराय छत्रपती झाले!

विक्रोळीतील म्हाडा वसाहतीत सापडले आई, मुलाचे मृतदेह

राज्यातील निवडणुका भाजपा-शिवसेना एकत्र लढणार

बेपत्ता लोकांच्या शोधाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांचे डोळे डबडबले!

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी चादर चढविली होती त्याला विरोध झाला होता पण महाविकास आघाडीकडून त्यासंदर्भात प्रतिक्रिया आल्या नाहीत.

Exit mobile version