कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू

राज्यात लागू असलेल्या कडक निर्बंधांचे उल्लंघन करणे औरंगाबादमधील सलून व्यावसायिकाच्या जीवावर बेतले. कडक निर्बंध असूनही आपले केशकर्तनालय उघडणाऱ्या औरंगाबादमधील एका व्यावसायिकाचा पोलीसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. मृताच्या नातेवाईकांकडून हा आरोप करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील हाताबाहेर गेलेल्या कोरोना परिस्थितीमुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा फटका समाजातील अनेक घटकांना बसत आहे. सरकारच्या निर्बंधांमुळे ना कष्ट करून पैसे कमावता येत, ना सरकारकडून कसली मदत मिळत. अशा परिस्थितीत त्रस्त झालेल्या औरंगाबादमधील फिरोज खान या व्यावसायिकाने आपले केशकर्तनालय उघडण्याचा निर्णय घेतला. १४ तारखेच्या बुधवारी त्याने आपले केशकर्तनालय उघडले. औरंगाबाद येथील उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ही गोष्ट कळली. ड्युटीवर असणाऱ्या दोन पोलीसांनी थेट त्या केशकर्तनालयात धडक मारली आणि त्या व्यावसायिकाला मारहाण सुरू केली. त्यांनी त्या व्यावसायिकाला इतका मारला की त्यात त्याचा जीव गेला.

 ही वाचा:

रेमडेसिवीरबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकारचे पॅकेज की ‘रिपॅकेजिंग’?

ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमधूनच ‘रेमडेसिवीर’ काळ्या बाजारात?

‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न

मृताच्या नातेवाईकांना ही घटना समजली. घडला प्रकार समजल्यावर मृताच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला. ते फिरोज याचा मृतदेह घेऊन उस्मानपुरा पोलीस स्थानकाबाहेर जमले. बघता बघता जमाव वाढत गेला. अखेर विपरीत प्रसंग टाळण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी केली. त्यांनी संबंधीत पोलीसांची कानउघाडणी केली असून शवविच्छेदन अहवालावरून योग्य ती कारवाई करायचे आश्वासन दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी फेसबूक लाईव्ह घेऊन राज्यातील लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी समजतील काही घटकांसाठी मदत जाहीर केली आहे. पण यात अनेक घटकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अशाच दुर्लक्ष झालेल्या घटकांमधले एक म्हणजे सलून व्यावसायिक. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सरकारचे लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर चोवीस तास उलटायच्या आतच औरंगाबादची ही घटना पुढे आली आहे.

 

Exit mobile version