22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामावरळीनंतर मुलुंडमध्ये हिट अँड रन, चार जखमी, ऑडी चालकाला अटक

वरळीनंतर मुलुंडमध्ये हिट अँड रन, चार जखमी, ऑडी चालकाला अटक

विजय गोरेला कांजूरमार्ग येथुन बहिणीच्या घरातून अटक केली

Google News Follow

Related

वरळी नंतर मुलुंड मध्ये ‘हिट अँड रन’ची घटना घडली आहे. मुलुंड पश्चिम येथील डम्पिंग रोड या ठिकाणी सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भरधाव ऑडी मोटारीने समोरून येणाऱ्या दोन रिक्षांना धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकासह ४ जण जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून पळून गेलेल्या ऑडी चालकाला कांजूरमार्ग येथून अटक करण्यात आली आहे.त्याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑडी चालकाने मद्यपान केले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली असून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

विजय दत्तात्रय गोरे (४३) असे अपघाता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ऑडी चालकाचे नाव आहे. विजय कांजूरमार्ग पश्चिम येथील रूनवाल फॉरेस्ट या ठिकाणी पत्नी आणि मुलांसह राहण्यास आहे. विजय हा एका आयटी कंपनीत नोकरीला असून तो ‘वर्क फॉर्म होम’ काम करतो. रविवारी रात्री विजयने भांडुपच्या एका बारमध्ये मद्यपान केले, त्यानंतर तो स्वतःची ऑडी मोटार (एमएच- ०१ -बीके-०११९) स्वतः चालवत ठाण्याला गेला, त्या ठिकाणी मित्रांसोबत मद्यपान केल्यानंतर त्याचे काही मित्र आणि विजय कर्जतला गेले, रात्रभर मौजमजा केल्यानंतर सोमवारी पहाटे ६ वाजता विजय हा ठाण्यात आला, त्या ठिकाणी त्याने मित्रांना सोडून मुंबईच्या दिशेने जाताना मुलुंड पश्चिम डम्पिंग रोड येथे भरधाव वेगात असलेल्या ऑडीने प्रवाशी घेऊन मुलुंड स्थानकाकडे निघालेल्या दोन रिक्षांना समोरून धडक दिली.

हे ही वाचा:

कावड यात्रा मार्गातील दुकानांच्या मालकांची नावे लिहिण्याचे आदेश स्थगीत

फडणवीसांनी गॅरेजमध्ये ठेवलेला बुलडोजर बाहेर काढावा…

अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला…

बासुरी स्वराज यांच्याविरोधातील याचिकेत चुकाच चुका !

ही धडक एवढी भीषण होती, दोन्ही रिक्षाचा चेंदामेंदा झाला, या घटनेनंतर घाबरलेल्या विजयने मोटार तेथेच सोडून पळून गेला.या अपघाता नंतर स्थानिक नागरिकांनी मुलुंड पोलीसांना कळवून जखमींना रिक्षातून बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी आलेल्या मुलुंड पोलिसांनी जखमीचा जबाब नोंदवून घटनास्थळी मिळून आलेली ऑडी मोटार, आणि अपघातग्रस्त रिक्षा ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्या,या अपघातात दोन रिक्षाचालकासह एक रेल्वे कर्मचारी आणि बेस्ट मध्ये काम करणारे दोघे असे चौघे जण जखमी झाले आहे. प्रकाश जाधव (४६) राहणार, शिवाजी नगर ठाणे, हणमंत चव्हाण (५७) राहणार मुलुंड पश्चिम, संतोष वालेकर (४९) आणि विवेक जयस्वाल(२६) वालेकर आणि जयस्वाल हे दोघे रिक्षा चालक असून इतर दोघे रिक्षातील प्रवाशी आहे.

मुलुंड पोलिसांनी तात्काळ या अपघातातील चालकाचा शोध सुरू केला असता, पोलिसांना ऑडी या मोटारीत एक मोबाईल फोन मिळून आला, या मोबाईल फोनच्या आधारे पोलिसांनी ऑडी चालक विजय गोरे याला कांजूरमार्ग पूर्व येथुन बहिणीच्या घरातून अटक केली, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत विजय गोरे याच्या तो तोंडाला मद्याचा वास येत होता अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली. या प्रकरणी विजय गोरे विरुद्ध सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ऑडी चालकाने मद्यपान केले होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांनी दिली असून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा