अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला दणका मिळाला आहे. दाऊदच्या खेडममधील संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे. या लिलावात दाऊदचे जन्मगाव असलेल्या रत्नागिरीतील खेड तालुक्यातील बंगले आणि आंब्याच्या बागा यांचा समावेश आहे. याआधी दाऊदच्या मुंबईतील काही मालमत्तांचा लिलाव झाला होता. त्यानंतर आताच्या यादीत रत्नागिरी येथील मालमत्तेचा समावेश आहे.
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या आणि कुटुंबियांच्या नावे असलेली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील मुंबके गावात असलेली सरकार कडून जप्त स्थावर मालमत्तेचा लिलाव शुक्रवार, ५ जानेवारी रोजी पार पडला. मुंबेक गावात असलेली दाऊद ची आई अमिबा बी आणि इतर नातेवाईकांच्या नावावर असलेल्या चार जमिनींचा लिलाव पार पडला. यातील दोन प्रॉपर्टी साठी कोणीही बिल्डर आलेले नाही. तर, उरलेल्या दोन साठी एकूण सात बिडर आले.
सर्वाधिक बोली मालमत्ता क्रमांक ००३ ला २.०१ कोटी रुपये तर ००४ ला ३.२८ लाख रुपये अशी लागली. दोन्ही मालमत्ता एकाच व्यक्तीने खरेदी केली आहे. अजय श्रीवास्तव यांनी ही संपत्ती खरेदी केली आहे. ४ नंबरची मालमत्ता ऑनलाईन पद्धतीने आधीच अर्ज करून विकत घेण्यात आली आहे. ई टेंडरमधून ही जामीन विकत घेण्यात आली होती. यापूर्वी देखील अजय श्रीवास्तव यांनी दाऊद ची रत्नागिरि लोटे येथील प्रॉपर्टी विकत घेतली होती.
हे ही वाचा:
भारत-नेपाळ संबंधांना मिळाली नवी ‘ऊर्जा’ ; जलविद्युत मेगा करार
उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर २०० तोफगोळे डागले
हिजबुलचा वॉन्टेड दहशतवादी जाविद अहमद मट्टू दिल्ली पोलिसांच्या ताब्यात!
राज्यसभेच्या ६८ खासदारांचा सन २०२४ मध्ये कार्यकाळ संपणार
स्मगलर्स फॉरेन एक्सचेंज मॅन्यूपुलेटर्स अंतर्गत दाऊदची संपत्ती जप्त करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात मुंबके गावात दाऊदची ही संपत्ती आहे. दाऊदच बालपणीच घर आणि त्याच्या कुटुंबाच्या तीन संपत्ती यामध्ये आहेत. दाऊदच्या आईच्या नावावर रजिस्टर संपत्ती चार वर्षापूर्वी जप्त केली. या सगळ्या प्रॉपर्टीची किंमत १९ लाखाच्या आसपास होती. दाऊदच्या संपत्तीचा लिलाव हा सफेमा कायद्याअंतर्गत आयकर भवनात करण्यात आला.