बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकून कर्नाटकात धर्मांतराचा प्रयत्न

रफिक नावाच्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल; बलात्काराचाही आरोप

बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकून कर्नाटकात धर्मांतराचा प्रयत्न

कर्नाटकमधून सक्तीचे धर्मांतराचे धक्कदायक प्रकरण समोर आले आहे. वैयक्तिक फोटोंच्या मदतीने महिलेला ब्लॅकमेल करून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला गेला असून बलात्काराचा आरोपही पीडित महिलेने केला आहे. सध्या पीडितेने एका जोडप्यासह ७ जणांविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. या संबधीत प्रकरणाचा तपास चालू आहे. २८ वर्षीय विवाहितेच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रफिक असे आरोपीचे नाव आहे.

माहितीनुसार, महिलेने आरोप केला आहे की एका व्यक्तीने त्याच्या पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला. तसेच बुरखा घालणं, कपाळावर कुंकु न लावणं याबाबतीत दबाव टाकण्यात आला. अहवालानुसार, रफिक आणि त्याच्या पत्नीने पीडित महिलेला फूस लावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तिचे वैयक्तिक फोटो काढले, ज्याच्या मदतीने तो तिला वारंवार त्रास देत धमकावत होता. आरोपींनी महिलेला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारण्याची मागणी केली होती.

हे ही वाचा:

यापुढे मी शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही!

‘हिंदुत्व सोडणाऱ्यांनी गाण्यात तरी ‘जय भवानी’ शब्द का वापरावा’

‘ईडीच्या कार्यक्षमतेत २०१४नंतर सुधारणा’

मुंबईतल्या भाजप कार्यालयाला आग!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रफिक आणि त्याच्या पत्नीने २०२३ मध्ये महिलेला बेलगावी त्यांच्या घरात राहण्यास भाग पाडले तसेच त्यांनी तिला जे काही सांगितले त्याचे पालन करण्याची मागणी केली. महिलेने आरोप केला आहे की, गेल्या वर्षी ते तिघे एकत्र राहत असताना रफिकने पत्नीसमोर तिच्यावर बलात्कार केला होता. बेलगावीचे एसपी भीमशंकर गुलेडा यांनी सांगितले की, या जोडप्याने महिलेला पाच वेळा नमाज अदा करण्यास, बुरखा घालण्यास आणि कुंकु न लावण्यास भाग पाडले होते. रफिकने महिलेला तिच्या पतीला घटस्फोट देण्यासही सांगितले होते, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. तिने हे मान्य केले नाही तर तिचे खाजगी फोटो लीक करू असेही त्याने सांगितले. पोलिसांनी एससी/एसटी कायद्यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version