गेल्या काही दिवसांपासून देशभरात विविध ठिकाणी रेल्वे उलटवण्याच्या प्रयत्न होत असलेल्या अनेक घटना समोर येत आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमधून अशा घटनांची माहिती वारंवार समोर येत आहे. अशातच आता गुजरातमध्येही रेल्वे रुळावरून घसरण्याचा कट रचल्याची घटना समोर आली आहे. मात्र, सुदैवाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कोणताही अपघात झालेला नाही.
पश्चिम रेल्वे, वडोदरा विभागाने शनिवारी एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अज्ञात व्यक्तीने किम रेल्वे स्थानकाजवळील यूपी लाइन ट्रॅकवरून फिश प्लेट आणि काही चाव्या उघडल्या आणि ट्रॅकवर ठेवल्या. यानंतर या मार्गावरून ट्रेनची वाहतून थांबवण्यात आली. तपासानंतर लवकरच या मार्गावर रेल्वेसेवा पुन्हा सुरू झाली. वारंवार अशा घटना उघडकीस येत असल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांसोबतच शासकीय रेल्वे पोलीस (GRP), रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि स्थानिक पोलीस देखील अत्यंत दक्षता घेत आहेत.
#WATCH | Gujarat | Some unknown person opened the fish plate and some keys from the UP line track and put them on the same track near Kim railway station after which the train movement was stopped. Soon the train service started on the line: Western railway, Vadodara Division pic.twitter.com/PAf1rMAEDo
— ANI (@ANI) September 21, 2024
उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये दोनच दिवसांपूर्वी अज्ञातांनी टेलिफोनच्या तारा टाकण्यासाठी वापरलेला जुना सहा मीटर लांबीचा लोखंडी खांब रेल्वे रुळावर लावला होता. मात्र, डेहराडून एक्स्प्रेस गाडीच्या चालकाने आपत्कालीन ब्रेक लावल्याने अपघात टळला. ही घटना रामपूरपासून ४३ किमी अंतरावर असलेल्या रुद्रपूर सिटी रेल्वे स्थानकाजवळ घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुद्रपूर शहर विभागाचे रेल्वे अभियंता राजेंद्र कुमार यांच्या फिर्यादीवरून शासकीय रेल्वे पोलीस स्टेशन, रामपूर येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
इस्रायलने हिजबुल्लाच्या कमांडरला अचूक टिपले
एफएटीएफने दहशतवाद विरोधी भारताच्या प्रयत्नांचे केले कौतुक, गंभीर धोक्याचा इशाराही दिला!
अरेच्चा! बघता बघता ट्रकला रस्त्याने गिळले
नितेश राणे यांचा किरीट सोमय्या करू नका!
फर्रुखाबाद येथे २४ ऑगस्ट रोजी अशाच एका घटनेत कासगंज- फर्रुखाबाद रेल्वे मार्गावरील भातासा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर जाड लाकूड ठेवण्यात आले होते, त्यामुळे एक प्रवासी गाडी आदळल्याने थांबली होती.