30 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरक्राईमनामासंगमनेरमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा प्रयत्न

संगमनेरमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा प्रयत्न

मुस्लीम तरुणाला पोलिसांनी केली अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतराचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर आता अहमदनगरच्या संगमनेरमध्ये अशाच प्रकारच्या धर्मांतराचा प्रयत्न समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी बिहारच्या एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. अक्रम शाहाबुद्दिन शेख असे आरोपीचे नाव आहे.

ऑनलाइन गेमद्वारे मुलांचे धर्मांतर करण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या शाहनवाज खान उर्फ बड्डो याला अटक करण्यात आली आहे. शाहनवाज खान हा या रॅकेटचा म्होरक्या आहे. अशातच आता तरुणाईला वेड लावणाऱ्या पबजी गेमच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मधल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी याप्रकरणी अक्रम शाहाबुद्दिन या तरुणाला अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.

संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर इथल्या एका २२ वर्षीय पीडित तरुणीशी अक्रम शाहाबुद्दिन शेख याने पबजी गेमच्या माध्यमातून ओळख केली होती. हा आरोपी मूळचा बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर येथील रहिवासी आहे. अक्रमसोबत त्याचा एक मित्र नेमितुल्ला हा देखील थेट बिहारहून संगमनेरात आला होता. उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवण्याचा प्रकार समोर आल्यानंतर संगमनेर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरु केला आहे.

अक्रम शाहाबुद्दिन शेखने पबजी गेमच्या माध्यमातून मैत्री झाल्यानंतर तरूणीला भेटण्यासाठी थेट संगमनेर गाठले होते. तरुणीसोबत गोड गोड बोलत आरोपी अक्रम तिला एका निवांत जागेत घेऊन गेला. काहीतरी चुकीचे घडत आहे हे पीडित तरुणीच्या लक्षात येताच ती घरी जाऊ लागली. त्यावेळी आरोपी अक्रम पीडित तरुणीसोबत बळजबरी करायला लागला आणि आपण बिहारला जाऊ लग्न करू असे सांगायला लागला. तरुणीने पळण्याचा प्रयत्न करताच तुझे व्हिडिओ बनवून मारून टाकू, अशी धमकी अक्रम आणि त्याच्या मित्राने दिली.

हे ही वाचा:

युगांडामध्ये इसिसशी संबंधित संघटनेकडून शाळेवर दहशतवादी हल्ला

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले

मणिपूर अजूनही धुमसतेच, १० हजारांहून अधिक घरे पेटली

पळवून नेलेल्या हिंदू तरुणीचा ‘निकाह’ पोलिसांनी रोखला

त्यानंतर तरुणीने आपल्या जवळच्या नातेवाईकांना संपर्क करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अक्रमला ताब्यात घेतले. तपासामध्ये त्याच्या मोबाईलमध्ये तो अनेक हिंदू मुलींच्या संपर्कात असल्याचे समोर आले. पब्जी गेम खेळण्याच्या माध्यमातून मुलींची मैत्री करून धर्मांतरण करण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक निष्कर्षामध्ये समोर येत आहे. या मुलाने आतापर्यंत किती मुलींना फसविले याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा