26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाव्यापाऱ्याने केला पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्काराचा प्रयत्न

व्यापाऱ्याने केला पुण्यातील तरुणीवर मुंबईत बलात्काराचा प्रयत्न

Google News Follow

Related

पुण्यातील एका तरुणीवर मुंबईतील हॉटेलमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी अंधेरी पूर्व येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

जिग्नेश मेहता (४९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. घाटकोपर पूर्व येथे राहणारा जिग्नेश मेहता याचा शेअर्स ट्रेडिंग आणि सुका मेव्याचा व्यवसाय आहे. पीडित तरुणी ही पुण्यातील असून ती एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करते. मागील दोन ते तीन महिन्यापासून ती मुंबईत असताना पूर्व उपनगरातील एका क्लब मध्ये तीची व्यापारी जिग्नेश मेहता सोबत ओळख झाली होती.

जिग्नेश हा वारंवार तिच्याशी संपर्कात राहण्याचा आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. जिग्नेश हा एका नवीन ब्रँडसह ड्रायफ्रूटचा मोठा व्यवसाय सुरू करणार असल्याचे त्याने पिडीत तरुणीला सांगितले होते. त्या ब्रँडसाठी पिडीत तरुणीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हावे अशी इच्छा त्याने व्यक्त केलेली. तो तीला मॉडेलिंग उद्योगात नाव कमवण्यासाठी मदतही करेल, असे आश्वासन त्याने तरुणीला दिले होते. ब्रँड अ‍ॅम्बेसेडरचा करार करण्यासाठी म्हणून शुक्रवारी अंधेरी पूर्व एमआयडीसी येथील एका हॉटेलच्या खोलीत पिडीत तरुणीला त्याने बोलवून घेतले. तिच्यावर बळजबरी करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तो करू लागला. पीडितेने त्याला विरोध करताच त्याने तिला मारहाण करून गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून तरुणी खोलीतून बाहेर पडली व तिने मोबाईलवरून पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागवली. घटनास्थळी दाखल झालेल्या एमआयडीसी पोलिसांनी तरुणीची सुटका करून गुन्हा दाखल करत जिग्नेश मेहता याला अटक केली आहे.

हे ही वाचा:

मढ, मार्वेमध्ये अस्लम शेख यांनी नियम डावलून उभारला स्टुडिओ

राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक

वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली

बोला, बजरंगाची कमाल!

आरोपी विरुद्ध अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा