24 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामातरुणीवर लोकलमध्ये जबरदस्ती करणाऱ्याला मस्जिद बंदर स्टेशन परिसरातून पकडले

तरुणीवर लोकलमध्ये जबरदस्ती करणाऱ्याला मस्जिद बंदर स्टेशन परिसरातून पकडले

सीएसएमटी ते मस्जिद स्थानकांदरम्यान तरुणीवर लोकलमध्ये जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मस्जिद (हार्बर लाईन) या स्थानकांदरम्यान एका तरुणीवर लोकल ट्रेनमध्ये जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणी परीक्षेसाठी हार्बर मार्गावरुन बेलापूर येथे चालली होती. त्यावेळी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी एकाला बेड्या ठोकण्यात आल्या असून नवाझू करीमला (४०) असे त्याचे नाव आहे.

पीडित मुलगी दक्षिण मुंबईमध्ये राहत असून तिला परीक्षेसाठी बेलापूर येथे पोहचायचे होते. त्यामुळे तिने सकाळी ७.२७ च्या सीएसएमटी- पनवेल लोकलमधील महिला डब्यात प्रवेश केला. त्याच डब्यात एक वयोवृद्ध महिला प्रवासी होती. लोकल सुरु होताच करीमने धावत ट्रेन पकडली. त्यांनतर सीएसएमटी ते मस्जिद या तीन ते चार मिनिटांच्या प्रवासात त्याने विद्यार्थीनीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डब्यात असलेल्या सहप्रवासी महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. विद्यार्थीनीने कडवा प्रतिकार केल्यामुळे आरोपीचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर मस्जिद स्थानकात ट्रेन थांबताच विद्यार्थिनी ट्रेनमधून उतरली आणि धावत जाऊन जनरलच्या डब्यात चढली.

विद्यार्थिनीचा भेदरलेला चेहरा पाहून डब्यातील पुरुष प्रवाशांनी तिला विचारले असता तिने ही घटना सांगितली. त्यांनी तातडीने रेल्वे हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधून यासंबंधी तक्रार केली. पुढे सानपाडा स्थानकात रेल्वे पोलिसांनी महिला पोलिसांना डब्यात पाठवले. नंतर महिला पोलिसांनी विद्यार्थिनीला बेलापूरला नेले. मात्र, मानसिक धक्का बसलेल्या विद्यार्थिनीला परीक्षा देणं शक्य झाले नाही. संबंधित पर्यवेक्षकाला परिस्थिती कळताच त्यांनी विद्यार्थिनीची परीक्षा नंतर घेऊ असे सांगितले. त्यानंतर महिला पोलिसांनी सीएसएमटी स्थानकात तरुणीला पुन्हा आणून तक्रार नोंदवून घेतली.

हे ही वाचा:

एमपीएलचा रणसंग्राम आजपासून रंगणार! ऋतुराज आणि केदार आमनेसामने

सोसायटीच्या आवारात लुंगी आणि गाउन घालून फिरू नका!

न्यूझीलंडची अर्थव्यवस्था मंदीत!

… म्हणून कोलकातामधील विमानतळावर लागली आग

तक्रारीपूर्वीच पोलिसांनी गुन्हेगाराचा तपास सुरू केला होता. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे, जीआरपी गुन्हे शाखा आणि आरपीएफची तीन पथके तयार करण्यात आली. या पथकांनी सीएसएमटी आणि मशीद स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरपीएफच्या जवानांनी करीमला आठ तासात मशीद बंदर स्टेशन परिसरात पाहिले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याला सीएसएमटी जीआरपीच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करीम हा मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

रात्री ९ ते सकाळी ६ दरम्यान लोकलमधील महिलांच्या डब्ब्यात एक सुरक्षारक्षक तैनात असतो. याआधी सुद्धा मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत, त्यामुळे सुरक्षेसाठी महिलांच्या डब्ब्यात सुरक्षा रक्षक तैनात केला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा