…पुन्हा रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न, रुळावर टाकला ७ मीटरचा खांब!

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु

…पुन्हा रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न, रुळावर टाकला ७ मीटरचा खांब!

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा ट्रेन उलटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रामपूरमध्ये रेल्वे रुळावर सात मीटर लांबीचा लोखंडी खांब टाकून काठगोदाम-देहरादून एक्स्प्रेस गाडी उलटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लोकोपायलटने दुरूनच खांब पाहिला आणि आपत्कालीन ब्रेक लावून एक्स्प्रेस थांबवली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना  घडली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी खांब हटवून रेल्वे पुढे पाठवून दिली. दरम्यान,  घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधीक्षक, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होवून तपास सुरु केला आहे.

सध्या रेल्वे उलटवण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यापूर्वी गाझीपुरमध्ये रेल्वे रुळावर लाकडी ओंडका ठेवून रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. कानपूरमध्ये रेल्वे रुळावर घरगुती सिलेंडरची टाकी ठेवण्यात आली होती, त्याचवेळी घटनास्थळी रूळाशेजारी पेट्रोलने भरलेली प्लास्टिकची बाटली देखील ठेवण्यात आली होती. अशा घटनांमुळे लोकोपायलट आणि पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.

अशीच घटना बुधवारी (१८ सप्टेंबर ) रामपूरमध्ये घडली. काठगोदाम-देहरादून एक्स्प्रेस गाडी उलटवण्यासाठी अज्ञातांकडून रेल्वे रुळावर विजेचा लोखंडी सात मीटर खांब टाकण्यात आला होता. लोकोपायलटच्या निदर्शांमुळे ट्रेन थांबवली आणि मोठा अनर्थ टळला. पोलीस अधीक्षक विद्या किशोर मिश्रा यांनी घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली. या प्रकरणात जो कोणी गुन्हेगार असेल त्याला लवकरच अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : 

माजी प्राचार्य संदीप घोष आता नावापुढे डॉक्टर लावू शकणार नाहीत !

हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक आणि ईदच्या मिरवणुकींवेळी भाईचारा

‘गांधी कुटुंबाकडून पंजाबला जाळण्याचे काम’

नंदुरबारमध्ये दोन गट भिडले, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड!

Exit mobile version