संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणात दोन जण सीसीटीव्हीत दिसले

हल्ला राजकीय वैमनस्यातून केला आहे का याचा पोलिस करत आहेत तपास

संदीप देशपांडेंवरील हल्ल्याप्रकरणात दोन जण सीसीटीव्हीत दिसले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी मॉर्निंग वॉकला जात असताना हल्ला झाला होता, त्याचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात दिसणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आता या दोघांनी देशपांडे यांच्यावर हल्ला केला आहे का, त्यामागे नेमके कोण आहे, कुणाचा हात त्यापाठी आहे, पूर्ववैमनस्यातून हे कृत्य घडले आहे का, राजकीय संदर्भ त्यामागे आहे का, अशा विविध गोष्टींची उकल आता पोलिस करणार आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाकडून याचा तपास आता सुरू झाला आहे. त्यातून देशपांडे यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचे खरे कारण समोर येऊ शकेल. मात्र या दोघांच्या हातात कोणताही रॉड अथवा स्टम्प दिसत नाही. ते नंतर त्यांना कुठून मिळाले अथवा कुणी दिले याचाही तपास आता पोलिस करतील.

हे दोघे हाफ पँटमध्ये असल्याचे दिसत असून एकाने हिरवा तर एकाने राखाडी रंगाचा टीशर्ट परिधान केल्याचेही त्यात दिसते आहे. या दोनजणांना भांडूप येथून ताब्यात घेण्यात आले आहे. भांडुप हा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गड मानला जातो, तसेच राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे येथील आमदार आहे, या प्रकरणात पोलीसाकडून या दोघांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दादरच्या शिवाजी पार्क या ठिकाणी चार जणांनी स्टॅम्प आणि बॅटने हल्ला केला होता, या हल्ल्यात संदिप देशपांडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात चार हल्लेखोराविरुद्ध हत्येचा प्रयत्न, धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हल्ल्याच्या वेळी हल्लेखोर हे ‘वरूणला नडतो काय, ठाकरेला नडतो काय’ अशी धमकी देत होते अशी माहिती संदीप देशपांडे यांनी पोलीसाना दिलेल्या जबाबात दिली आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसानी दिली होती होती, या हल्लेखोराला अटक करण्यासाठी शिवाजी पार्क पोलिसांनी ८ पथके तयार केली होती, तसेच गुन्हे शाखा कक्ष ५चे पथक देखील या हल्लेखोरांच्या मागावर होते.

हे ही वाचा:

मुंबईचा प्रभात कोळी बनला सात समुद्रांचा राजा

उद्धवजी, हे पाप नाही मग पुण्य कसे?

हिजबुल मुजाहुद्दीनच्या कमांडरची बारामुल्लाहमध्ये मालमत्ता जप्त

नितेश राणेंचा चिमटा आणि विधानसभा अध्यक्ष म्हणाले अनोळखी भटक्या कुत्र्यांवर कारवाई नाही!

शिवाजी पार्क, दादर येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना संदीप देशपांडे यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टम्पच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. त्यात ते जखमी झाले होते. त्यांच्या उजव्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले. दुखापतग्रस्त हात आणि पायावर उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

संदीप देशपांडे हे सातत्याने राजकीय विधाने करत होते. त्यातून संतापून हे कृत्य घडले असावे असा कयास बांधला जात आहे. या आरोपींची नावे सोळंकी आणि खरात अशी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या कुठल्या पक्षाशी संबंध आहे, याचीही शहानिशा करण्यात येत आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर रुग्णालयात त्यांची विचारपूस करण्यासाठी स्वतः मनसेप्रमुख राज ठाकरे, त्यांचे पुत्र अमित ठाकरे व मनसेचे सगळे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version