सध्या देशात ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट पहिल्यांनंतर अनेक जण देशभक्तीपर घोषणा देत आहेत. असाच चित्रपट पाहून घोषणा दिल्याने उत्तर प्रदेशमध्ये काही तरुणांवर अज्ञातांनी हल्ला केला आहे.
यूपीच्या फाजिलनगर शहरात ‘ द काश्मीर फाईल’ चित्रपट पाहून चित्रपटगृहातून बाहेर पडताना काही तरुण देशभक्तीपर घोषणा देत होते. तेव्हा त्यांच्यावर काही विशिष्ट समाजातील लोकांनी चाकूने हल्ला केला. या घटनेत तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना तरुणांनी काही घोषणा दिल्या, त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असे तेथील स्थानिक माहिती देत आहेत.
फाजीलनगर पंचायत परिसरात असलेल्या चित्रपटगृहात काश्मीर फाइल्स हा चित्रपट सुरू आहे. शुक्रवारी शेवटच्या शोमध्ये जोकवा बाजार येथील काही तरुण तो चित्रपट पाहण्यासाठी आले होते. चित्रपट पाहून झाल्यावर तरुण देशभक्तीपर घोषणा देत होते, ज्याने एका विशिष्ट समाजातील तरुणांना हळहळ वाटली. शोमधून बाहेर पडल्यानंतर घोषणाबाजीवरून तरुणांमध्ये बाचाबाची सुरू झाली. दरम्यान, विरुद्ध गटाने तरुणांनी घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांवर चाकूने हल्ला करण्यास सुरवात केली.
हे ही वाचा:
…. म्हणून मविआ नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही!
चलो दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया
एमआयएम शिवसेनेला म्हणते, मला बी जत्रंला येऊ द्या की!
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये महिलेवर बलात्कार झाल्यानंतर राहुल गांधींचा कानाडोळा
या घटनेत अशोक जैस्वाल, कृष्णा, आणि लाल गोंड हे तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांना स्थानिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळाताच आरोपी तरुणांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमी तरुणांवर कुटुंबीय उपचार करत असून त्यांची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे फाजिलनगर मधील पोलिसांनी सांगितले आहे.