केरळमधील कन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरएसएस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कार्यालयावर बॉम्ब फेकला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दीड वाजता कन्नूरच्या पायनूर येथील आरएसएस कार्यालयाच्या इमारतीवर बॉम्ब फेकण्यात आला. या हल्ल्यात कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
Kerala | Bomb squad examines the RSS office in Payyannur, Kannur which was allegedly bombed early this morning pic.twitter.com/mPtmNA86bU
— ANI (@ANI) July 12, 2022
९ जुलै रोजी आरएसएसने उदयपूर कन्हैया लाल हत्याकांडावर जोरदार टीका केली होती आणि हिंदू समुदायाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. हा हल्ला त्याची प्रतिक्रिया असू शकते, असे म्हटलं जात आहे. केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्हीडी सठेशन यांना येथील न्यायालयाने ११ जुलै रोजी आरएसएसने नोंदवलेल्या एका प्रकरणात नोटीस बजावली आहे. आरएसएसचे विचारवंत एम.एस. गोळवलकर यांच्यावर सतीशन यांनी केलेल्या वक्तव्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा:
एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार सामूहिक राजीनामे
खासदारांच्या दबावानंतर भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा
सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
लोक पेटवत आहेत सोन्याची लंका !
दरम्यान, या वर्षी फेब्रुवारीमध्ये केरळच्या एका पोलीस अधिकाऱ्याला आरएसएस कार्यकर्त्यांची माहिती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला दिल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. तो पीएफआयची राजकीय शाखा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला माहिती लीक करत होता. यापूर्वी १५ नोव्हेंबर २०२१ रोजी केरळमधील पलक्कड येथे एका आरएसएस कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.