पाटणा शहरातील धनरूआ भागात सोमवारी दिवाळीमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात झालेल्या वादात दोन गट आमनेसामने आले. या दरम्यान गोळीबाराची घटना घडली. दुसऱ्या दिवशी मंगळवारीही दोन्ही गट एकमेकांना भिडले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या एका गटाने तरुणाला ताब्यात घेतल्यावर लोकांचा संताप अनावर झाला आणि जमावाने पोलिसांच्या ताब्यातून त्या तरुणाची सुटका केली. या राडेबाजीत पोलिस ठाण्याच्या प्रमुखांसह चार पोलिसांसह तिघे जखमी झाले आहेत.
दुसऱ्या पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सोमवारी रात्री येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनावरून येथे दोन गट पडले होते. एक गट आमदार रेखा देवी तर दुसरा गट आयोजन समितीचे सदस्य श्याम गोप यांचा होता. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आमदार रेखादेवी घटनास्थळी पोहोचल्या आणि उद्घाटन करून परतल्या. यावरून श्याम गोप संतापले.
हे ही वाचा:
५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले
सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात
ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान; पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रझ्झाककडून माफी!
ऐन दिवाळीत कॅनडात खलिस्तानी आणि हिंदूंमध्ये संघर्ष!
त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर मारहाण आणि गोळीबाराला सुरुवात झाली. या दरम्यान एका सरपंचाला जखम झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आयोजकांवर पोलिस परवानगी न घेतल्याचा आरोप केला. मात्र घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन्ही गटांत हाणामारी झाली. या दोन्ही गटांत गोळीबारही झाला. आता या दोन्ही गटांतील सदस्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी परिसरात छापे मारले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यावेळी गोळीबाराच्या तब्बल ३६ फेऱ्या झाडल्या गेल्याचे उपस्थितांनी सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला गुड्डू कुमारला ताब्यात घेतले. मात्र या कारवाईमुळे संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमोरच गोळीबार करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ओरोपी गुड्डूची पोलिसांच्या ताब्यातून जबरदस्तीने सुटका केली.