नवी मुंबई हेल्पलाइन क्रमांक ११२ वर एक व्यक्ती मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी आणि दादर रेल्वे स्थानकावर हल्ला करणार असल्याचा फोन आला. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आली होती. पण सुदैवाने ही अफवा ठरली आहे. नवी मुंबई हेल्पलाइन क्रमांक ११२ वरून मुंबई कंट्रोल रूमला फोन आला होता.
गुजरातमधील पोरबंदर येथून येणारा एक व्यक्ती मुंबईतील कुर्ला, सीएसएमटी आणि दादर रेल्वे स्थानकावर हल्ला करणार असल्याची माहिती औरंगाबाद गंगाखेड येथील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर नवी मुंबई हेल्पलाइनकडून त्याची माहिती रेल्वे पोलीस आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आली. या संदर्भात केलेल्या चौकशीत कोणतेही तथ्य आढळून आले नाही.
यापूर्वी , मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानमधील एका क्रमांकावरून २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारे संदेश आले होते. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला.
हे ही वाचा:
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
देशातील दहशतवादी घटनांनुसार खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सांताक्रूझमध्येही एका व्यक्तीला व्हिडिओ कॉलवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. अशा घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण पडत आहे.