28 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामा‘अमर उजाला’च्या पत्रकारावर अज्ञातांचा हल्ला

‘अमर उजाला’च्या पत्रकारावर अज्ञातांचा हल्ला

Google News Follow

Related

हिंदी वृत्तवाहिनी ‘अमर उजाला’चे ज्येष्ठ पत्रकार आलोक वर्मा यांच्यावर मंगळवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. पंजाबमधील जिरकपूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर निर्घृण हल्ला केला. या हल्ल्यात वर्मा हे जखमी झाले आहेत.

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार, आलोक वर्मा हे आपली ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्ती हे दुचाकीवरून आले आणि त्यांनी आलोक वर्मा यांच्या डोक्यात बेसबॉल बॅट आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी त्यांचे पाकीट आणि मोबाईल घेऊन पळ काढला.

हल्ला झाल्यानंतर जखमी आलोक वर्मा मदतीसाठी आरडाओरडा करत होते, मात्र त्यांना वाचवण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. नंतर आलोक वर्मा कसेतरी घरी पोहचले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. सुधीर गर्ग यांनी सांगितले की, आलोक वर्मा यांना पहाटे ३.४५ वाजता आपत्कालीन स्थितीत आणण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या असून २७ टाके टाके पडले आहेत.

हे ही वाचा:

बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात

साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती

या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा

कान्स चित्रपट महोत्सवात भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’

दरम्यान, चंदीगड प्रेस क्लबने आलोक वर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असून पंजाब पोलिसांनी हल्लेखोरांवर फौजदारी गुन्हा नोंदवला आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही वर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच असे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) सरकारवर त्यांनी निशाणा साधला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा