पुण्यामध्ये एटीसीने मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या एका तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद जुनेद असे आहे. त्याला एटीएसच्या पथकाने पुण्यातील दापोडी येथून अटक केली होती. जुनेद मोहम्मद याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जुनेद हा सोशल मीडियाच्या माध्यमातून गझवद -उल- हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला होता. काश्मीर मधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे. यामुळे दिल्ली स्पेशल सेलने महाराष्ट्र एटीएसला जुनेद याच्यावर नजर ठेवण्यास सांगितले होते. त्यांनतर जुनेदच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दहा हजार घेतल्याचे मान्य केले आहे. एटीएसने जुनेदला अटक केली असून मंगळवार, २४ मे रोजी त्याला पुणे न्यायालयात हजर केले होते. त्यांनतर त्याला न्यायलयाने ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार
आशा भोसले म्हणतात, पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा!
‘यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा उजवा हात’
बांगलादेशी मतदार तृणमुलच्या उमेदवार
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला मोहम्मद जुनेद हा अकोल्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोहम्मद हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या जम्मू-काश्मीर येथील दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता. दरम्यान या तरुणाला पुणे न्यायालयात मंगळवार, २४ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास हजर करण्यात आले होते.