एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, पाच संशयिताना अटक

एटीएसची रत्नागिरीत मोठी कारवाई, पाच संशयिताना अटक

रत्नगिरी जिल्ह्यात एटीएसने मोठी कारवाई करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.खैराच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या पाच जणांपैकी एक संशयिताचे पडघा कनेक्शन समोर आले आहे.सूत्राच्या म्हणण्यानुसार खैराच्या तस्करीतुन येणारा पैसा हा टेरर फडिंगसाठी वापरला जात होता.परंतु एटीएसने याबाबत अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील पडघा येथे काही महिन्यांपूर्वी एनआय आय आणि महाराष्ट्र एटीएसने केलेल्या कारवाईनंतर पडघ्यातील काही संशयित एटीएसच्या रडार होते, त्यापैकी एका संशयितांच्या हालचालीवर एटीएसचे बारीक लक्ष होते. हा संशयिताचे कर्नाटक राज्यात सतत जाणे येणे सुरू झाल्यामुळे त्यांच्यावरील संशय आणखीनच बळावला होता.

एटीएसने ने त्याच्या बारकाईने लक्ष केंद्रित केले असता सदर संशयित हा खैराच्या झाडाच्या तस्करीत गुंतला असल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली.

पडघा येथील संशयित हा आपल्या काही सहकाऱ्यासोबत कर्नाटकातून खैराच्या झाडाची एक खेप घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे येणार असल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली. एटीएसने बुधवारी सावर्डे येथे सापळा रचून एका संशयित ट्रक सह पाच जणांना ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली असता त्यात कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या खैराची झाडे मिळून आली.

हे ही वाचा :

ज्ञानेश महारावांची चरबी उतरवली!

भाजपाचा विजय आणि उबाठाचे ढोलताशे

ठाणे डीएसओ खो-खो स्पर्धेत श्री मावळी मंडळ शाळेला तिहेरी मुकुट

‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’

एटीएसने पडघा येथील संशयितासह जणांना या प्रकरणी अटक करून खैराने भरलेला ट्रक जप्त केला आहे, अटक करण्यात आलेले पाच ही जण नाशिक, अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील असल्याची माहिती समोर आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खैराच्या लाकडाची तस्करी करून येणारी रक्कम ही टेरर फंडिंगसाठी वापरत असावे असा संशय व्यक्त करण्यात येत असून या अनुषंगाने या पाच जणांकडे चौकशी सुरू आहे.

Exit mobile version