आयसिजी आणि एटीएसची गुजरातमध्ये मोठी कारवाई, ६ जण अटक

आयसिजी आणि एटीएसची गुजरातमध्ये मोठी कारवाई, ६ जण अटक

भारतीय तटरक्षक दलाला (ICG) आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त कारवाईला ड्रग्जच्या विरोधात मोठं यश मिळाले आहे. या दोन्ही पथकांनी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ ५० किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली आहे. तसेच याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

शनिवार, ८ ऑक्टोबर रोजी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त कारवाईत ५० किलो ड्रग्ज घेऊन जाणारी बोट पकडली आहे. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ३५० कोटी रुपये किंमत आहे. तसेच या पथकांनी बोटीवरील सहा जणांना अटक देखील केली आहे. पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ बंदरात नेली जाणार आहे. हवामान खराब असतानाही गुजरात एटीएससह आयसीजी पथकाने हे मिशन पूर्ण केल्याचं सांगितले जात आहे. ही बोट आणि ड्रग्जशी संबंधित अधिक माहितीसाठी एजन्सीने अधिक तपास सुरू केला आहे.

हे ही वाचा:

नाशिक अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ‘इतकी’ मदत जाहीर

या प्रकरणी सीबीआयकडून लालू यादवांसह १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

वर्षभरात आयसिजी आणि एटीएसची ही सहावी कारवाई आहे. विशेष म्हणजे आयसिजीने ड्रग्जने भरलेली बोट पकडण्याची एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे दोनशे कोटी रुपयांचे ४० किलो हेरॉईन पकडण्यात आले होते. एवढंच नाही, तर यादरम्यान सहा जणांना अटक करण्यात आली, जे पाकिस्तानी असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच कोचीमध्ये यापूर्वी एनसीबी आणि आयसीजीने मिळून एक पाकिस्तानी बोट पकडली होती, त्यामध्येसुद्धा करोडोंचे ड्रग्ज सापडले होते.

Exit mobile version