डीआरडीओ शास्त्रज्ञ कुरूलकरांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडी

हनी ट्रॅप प्रकरणात करण्यात आली होती अटक

डीआरडीओ शास्त्रज्ञ कुरूलकरांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडी

पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी पुण्यातील संरक्षण विभागामधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांना एटीएसने अटक केली होती. त्यानंतर पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना १५ मे पर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणाची सुनावणी आज, ९ मे रोजी पार पडली. या प्रकरणात वकिलांनी तपासाचा प्रगती अहवाल सादर केला आहे. गेल्या तीन चार दिवसात विविध साक्षीदार तपासण्यात आले असून नवी माहिती देखील समोर आली आहे. तपास अधिकाऱ्यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून काही रिकव्हर केलेला डेटा प्राप्त झाला आहे. आरोपींवर केलेले आरोप गंभीर असल्याने सदर डेटा तपासणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले होते.

काही फोटो आणि काही डेटा आरोपीने परदेशी नागरिकासह शेअर केला आहे. मात्र, आरोपीचे पद लक्षात घेता संवेदनशील डेटा शेअर करणे हे त्याच्याकडून राष्ट्रविरोधी कृत्य आहे असे म्हणता येईल असं न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे हा तपास कोठडीत करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

‘चॅटजीपीटी’चा पहिला बळी; चीनमध्ये खोट्या अपघाताची बातमी करणाऱ्याला अटक

धक्कादायक!! इराणमध्ये यावर्षी २०३ जणांना फासावर लटकवले!

मॉलमध्ये खरेदी करताना भारतीय वंशाच्या महिलेला लागली गोळी आणि…

लोकलमध्ये फुकटची थंड हवा घेणारे प्रवासी वाढले

डीआरडीओचे शास्त्रज्ञ यांनी पुणे येथील त्यांचे कार्यालयामध्ये शासकीय कर्तव्य बजावित असताना पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह ( PIO) चे हस्तक यांच्याशी सोशल मिडिया च्या माध्यमातून व्हॉटअपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडिओ कॉलने संपर्कात राहिल्याच्या आरोपातून एटीएसने त्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली.

Exit mobile version