23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामामनसुख हत्या प्रकरणात वाझे विरोधात पुरावे

मनसुख हत्या प्रकरणात वाझे विरोधात पुरावे

Google News Follow

Related

दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख जयजीत सिंह यांनी मंगळवारी मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनसुख हिरेन केसमध्ये त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. मनसुख हिरेन याची हत्या नेमकी कशी झाली? या हत्येचा कट कसा रचला गेला? निलंबित एपीआय वाझे ह्याची या हत्येत नेमकी काय भूमिका होती? या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींनी काय कबुली दिली? अशा अनेक गोष्टींवर जयजीत सिंह ह्यांनी भाष्य केले.

मुकेश अंबानी याच्या घराबाहेर ज्यांची स्कॉर्पिओ जिलेटीनने भरलेली आढळली असे ठाण्यातील उद्योगपती मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला. सुरुवातीला ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न झाला. पण पहिल्या दिवसापासून मनसुख यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय ‘ते आत्महत्या करू शकत’ नाहीत असे सांगत आत्महत्येचा दावा फेटाळून लावत होते. आक्रमक विरोधकांसमोर झुकत महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला. तेव्हापासूनचा सर्व घटनाक्रम जयजीत सिंह ह्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माध्यमांसमोर पुन्हा एकदा उलगडला.

काय म्हणाले जयजीत सिंह?
६ मार्च रोजी मुंब्रा पोलिसांनी या खुनाचा तपास आमच्या ताब्यात दिला. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे एटीएसने ७ मार्च राय ताब्यात घेतली. त्यानंतर आम्ही मनसुख यांच्या पत्नीचा विमला हिरेन यांचा जबाब नोंदवला. विमला यांनी आम्हाला जबाब देताना मनसुख यांनी आत्महत्याच केली नसून त्यांची हत्या झाली असल्याचा संशय बोलून दाखवला. त्यावेळी ही हत्या सचिन वाझे यानेच केली असल्याचा संशयही विमला हिरेन यांनी बोलून दाखवला. त्याच दिवशी एटीएसने खून, खुनाचा कट रचणे, पुरावे नष्ट करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला. यानंतर मुंब्रा येथील घटनास्थळी जाऊनही एटीएसने तपास केला. पण आम्हाला तिथे काहीही सापडले नाही. मृतदेहाच्या अंगावरही आम्हाला काहीच पुरावे आढळले नाहीत. असे जयजीत सिंह ह्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

संपुर्ण व्याजमाफी देणे अशक्य; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सचिन वाझेचे बनावट आधार कार्ड ताब्यात

बंद शाळांसाठी पोषण आहाराचे कंत्राट; महानगरपालिकेचा अजब कारभार

वाझे विरोधात पुरावे सापडले
८ मार्च रोजी एटीएसने सचिन वाझे ह्याला चौकशीसाठी बोलावले. यावेळी सचिन वाझे ह्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले. ‘ती’ स्कोरिपो गाडी आपल्या ताब्यात नव्हती आणि आपण मनसुख हिरेनला ओळखत नसल्याचा दावा यावेळी वाझेने केला. आपला या गुन्ह्यात कोणताही सहभाग नसल्याचे वाझेने एटीएसला सांगितले. पण एटीएसला वाझे विरोधात पुरावे सापडले आहेत. त्यानुसार तपास सुरु आहे. वाझेचा या प्रकरणात नेमका कशाप्रकारे सहभाग होता याचा आम्ही शोध घेत आहोत असे जयजीत सिंह यांनी सांगितले.

बुकी, सिमकार्ड आणि वाझे
मनसुख हत्येच तपास करताना आम्हाला एक सिमकार्ड सापडले. बुकी नरेश गौर याच्याकडे हे सिमकार्ड होते. हे सिमकार्ड गुजरातच्या एका माणसाकडून घेतले गेले. गुजरातच्या एका कंपनीच्या नावे हे सिमकार्ड आहे. वाझे ह्याच्या सांगण्यावरून बुकी असलेल्या गौरने विनायक शिंदेला हे सिम कार्ड पोहोचवले. २१ मार्च रोजी एटीएसने विनायक शिंदे आणि नरेश गौरला अटक केली.

विनायक शिंदेकडून गुन्हा कबुल
लखनभैय्या चकमक प्रकरणातील दोषी म्हणून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि कोरोना काळात पॅरोलवर बाहेर आलेल्या विनायक शिंदे याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. विनायक शिंदेनेच हिरेनला भेटण्यासाठी बोलावले होते. हा गुन्हा नेमका कसा घडला याविषयीही त्याने सांगितले. त्यानंतर एटीएस पथक विनायकला घेऊन घटनास्थळी गेले आणि गुन्ह्याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले. या प्रकरणात १४ पैकी काही सिमकार्डस् सुरु करण्यात आले होते. तसेच काही सिमकार्डस् आणि मोबाईल्स नष्टही करण्यात आले.

वाझेला ताब्यात घ्यायची तयारी सुरु
एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेची एटीएसला चौकशी करायची आहे. त्यासाठी आम्ही ट्रान्स्फर वॉरंट मिळवले आहे. २५ तारखेला एनआयएच्या कोर्टात त्याबद्दल सुनावणी होईल. आम्ही या गुन्ह्याच्या सूत्रधारांना शोधून अटक करू असे जयजीत सिंह यांनी यावेळी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा