दहशतवादविरोधी पथकाकडून तिसरा आरोपी अटकेत

दहशतवादविरोधी पथकाकडून तिसरा आरोपी अटकेत

दहशतवादासंदर्भात गेल्या काही दिवसांत दोन आरोपींना अटक केल्यानंतर राज्यातील दहशवादविरोधी पथकाकडून (एटीएस) तिसरी अटक झाली आहे.

एटीएसने वांद्रे परिसरातून या आरोपीला अटक केली आहे. जोगेश्वरी आणि मुंब्रा परिसरातून झाकीर आणि रिझवान यांच्या अटकेनंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या तिसऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. इरफान रहमत अली शेख असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. एटीएसने त्याला अटक करतानाच त्याच्या घरावर छापेही मारले. त्यातून इरफान शेखच्या घरातून काही आक्षेपार्ह साहित्य आढळल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

झाकीर आणि रिझवानची पुन्हा कोठडी मिळवल्यानंतर एटीएसने ही कारवाई केली आहे. गेले काही दिवस एटीएसकडून इरफान शेख याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होतं.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ६ दहशतवाद्यांना अटक केली होती, त्यामधील एक आरोपी सायन परिसरात राहत होता.

सायनमधल्या जान मोहम्मदचया अटकेनंतर एटीएसनेसुद्धा तपासाला सुरुवात केली. ज्यामध्ये झाकीर, रिझवान आणि आता इरफान शेख याला अटक करण्यात आलीय.

हे ही वाचा:

मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….

मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….

अमरिंदर सिंग-अजित डोवाल भेटीत नेमके काय घडले?

अनिल देशमुखांना दिलासा नाही; सुनावणी ४ ऑक्टोबरला

२० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने एक मोठी कारवाई केली होती. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथून रिजवान मोमीन नावाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याआधी, दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन कारवाई करत एका दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानेही एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले होते.

Exit mobile version