29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामापुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर होते 'छाबड हाऊस'

पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्याच्या निशाण्यावर होते ‘छाबड हाऊस’

मुंबईतील छाबड हाऊसची सुरक्षा वाढवली

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मागील काही दिवसात पुण्यातून अटक केलेल्या दहशतवादयाची संख्या चार झाली असून रत्नगिरी येथून चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेला चौथा आरोपी हा आर्थिक रसद पुरवत होता अशी माहिती समोर आली आहे.  

 

दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातून अटक  करण्यात आलेल्या चार दहशतवादी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्याकडे मुंबईतील छाबड हाऊसचे नकाशे आणि छायाचित्रे सापडली आहेत. या दहशतवाद्याच्या निशाण्यावर छाबड हाऊस असल्याचा संशय व्यक्त करीत एटीएसने मुंबई पोलिसांनी याची सूचना दिली.  

 

२६/११ला मुंबईवर झालेल्या हल्ल्यात छाबड हाऊस लक्ष्य करण्यात आले होते. तिथे राहात असलेल्या ज्यू कुटुंबियांवर दहशतवाद्यांनी हल्ला करून त्यांना ठार मारले होते. त्यात त्या दांपत्याचा लहान मुलगा मात्र बचावला होता.

 

हे ही वाचा:

 

पाकिस्तानमधील भाच्यांची भारतातील मामाशी भेट होणार

 

छोटा शकीलचा शूटर लईक शेखच्या २५ वर्षांनंतर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

 

मलकापूरमध्ये दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात प्रवाशांचा मृत्यू

बंगालच्या उपसागरात अडकलेल्या ३६ मच्छिमारांची भारतीय नौदलाकडून सुटका  

 

एटीएसच्या सुचनेनंतर मुंबई पोलिसांनी छाबड हाऊसची सुरक्षा वाढवली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान ऊर्फ अमीर अब्दुल हमीद खान (वय २३) आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी (वय २४, दोघेही रा. मिठानगर, कोंढवा, मूळ रा. हरमाला कुलकुंडी, रतलाम, मध्यप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांना पुण्यात घर घेऊन देणारा तसेच नोकरी देणारा अब्दुल पठाण याला शुक्रवारी अटक करण्यात आली होती.    

 

दरम्यान शनिवारी एटीएसने रत्नगिरी येथून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार महम्मद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला असून, ‘एटीएस’कडून त्याचा शोध सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा