महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (महाराष्ट्र एटीएस) बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या चार कार्यकर्त्यांना रायगड जिल्ह्यातील पनवेल येथून अटक केली आहे. एटीएस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बंदी घातलेल्या संघटनेच्या राज्य विस्तार समितीचा एक स्थानिक सदस्य, स्थानिक युनिटचा एक सचिव आणि अन्य दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
भारत सरकारने पीएफआयवर बंदी घातलेली असतानाही मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पनवेलमध्ये पीएफआय संघटनेचे दोन पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांची भेट झाल्याची गुप्त माहिती एटीएसला मिळाली होती. महाराष्ट्र एटीएसच्या काही अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. एटीएसच्या पथकाने मुंबईपासून ५० किमी अंतरावर असलेल्या पनवेलमध्ये छापा टाकून पीएफआयच्या चार कार्यकर्त्यांना पकडले.
चौकशीनंतर, चौघांना मुंबईतील एटीएसच्या काळा चौकी युनिटमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इसीस सारख्या जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पीएफआय आणि त्याच्या अनेक संलग्न संस्थांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली होती.
हे ही वाचा:
पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस
पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक
भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा
समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल
२५० पेक्षा जास्त लोक ताब्यात
गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या देशव्यापी छाप्यांमध्ये पीएफआयशी संबंधित २५० पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. पीएफआयच्या सर्वोच्च पदावरचे लोक भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या दिशेने काम करत होते. पीएफआयचे लोकही अनेक देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले दिसून आले आहे